Contact Banner

नगरपरिषद निवडणुकीत भाजपानं बाजी मारली, पण नेमकं कोण कुठे जिंकलं? वाचा संपूर्ण यादी!

 


नगरपरिषद निवडणुकीत भाजपानं बाजी मारली, पण नेमकं कोण कुठे जिंकलं? वाचा संपूर्ण यादी!
लेवाजगत न्यूज -महाराष्ट्रात तब्बल ५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची घोषणा झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर महाराष्ट्र निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या. २ डिसेंबर रोजी मतदान व ३ डिसेंबर रोजी मतमोजणीची तारीखही निश्चित केली. पण आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडल्याचा मुद्दा न्यायालयात गेल्यानंतर या कार्यक्रमात बदल करण्यात आला. काही नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील मतदान २० डिसेंबर रोजी तर मतमोजणी व निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर झाले. या निकालांनुसार नगरपरिषद निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष निवडून आले?
महाराष्ट्रात झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे ११७ नगराध्यक्ष निवडून आले, तर सत्तेतील त्यांचे मित्रपक्ष शिंदेंच्या शिवसेनेचे ५३ नगराध्यक्ष निवडून आले. महायुतीतील तिसरा मित्रपक्ष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ३७ नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्ष निवडणुकीत विजय मिळाला. विरोधकांपैकी काँग्रेसचे सर्वाधिक २८, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ तर ठाकरेंच्या शिवसेनेचे ९ नगराध्यक्ष निवडून आले. इतर पक्षीयांच्या उमेदवारांनी ३७ ठिकाणच्या नगराध्यक्ष निवडणुकीत विजय मिळवला.

महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणूक विजेत्यांची संपूर्ण यादी
जिल्हा नगरपरिषद नगराध्यक्ष विजेता पक्ष
अकोला अकोट माया धुले भाजप (BJP)
अकोला तेल्हारा वैशाली पिल्लेवार भाजप (BJP)
अकोला बाळापूर अरफिन परवीन काँग्रेस (INC)
अकोला मुर्तिजापूर हर्षल साबळे भाजप (BJP)
अमरावती अचलपूर रूपाली माथने भाजप (BJP)
अमरावती अंजनगाव सुर्जी अविनाश गायगोले भाजप (BJP)
अमरावती वरुड ईश्वर सलामे भाजप (BJP)
अमरावती चांदूर बाजार मनिषा नांगलिया इतर (Others)
अमरावती मोर्शी रश्मी उमाळे – प्रतिक्षा गुल्हाने शिवसेना (SHS)
अमरावती शेंदुरजनाघाट सुवर्णा वरखडे भाजप (BJP)
अमरावती दर्यापूर मंदाकिनी भारसाकडे काँग्रेस (INC)
अमरावती चांदूर रेल्वे प्रियंका विश्वकर्मा विंचित बहुजन आघाडी
अमरावती धामणगाव अर्चना रोठे भाजप (BJP)
अहिल्यानगर संगमनेर मैथिली तांबे इतर (Others)
अहिल्यानगर कोपरगाव पराग संधान भाजप (BJP)
अहिल्यानगर श्रीरामपूर करण ससाणे काँग्रेस (INC)
अहिल्यानगर रहाता स्वाधीन गाडेकर भाजप (BJP)
अहिल्यानगर पाथर्डी अभय आव्हाड भाजप (BJP)
अहिल्यानगर राहुरी भाऊसाहेब मोरे इतर (Others)
अहिल्यानगर देवळाली-प्रवरा सत्यजित कदम भाजप (BJP)
कोल्हापूर पन्हाळा जयश्री पवार जनसुराज्य पक्ष
कोल्हापूर गडहिंग्लज महेश तुरबतमठ राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)
कोल्हापूर मुरगुड सुहासिनी पाटील शिवसेना (SHS)
कोल्हापूर वडगाव विद्या पोळ इतर (Others)
कोल्हापूर मलकापूर रश्मी कोठवळे जनसुराज्य
कोल्हापूर कुरुंदवाड मनिषा डांगे इतर (Others)
कोल्हापूर कागल सविता माने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)
कोल्हापूर जयसिंगपूर संजय पाटील इतर (Others)
कोल्हापूर इचलकरंजी उपलब्ध नाही उपलब्ध नाही
गडचिरोली गडचिरोली प्रनोती आंबोकर भाजप (BJP)
गडचिरोली देसाईगंज लता सुंदरकर भाजप (BJP)
चंद्रपूर बल्लारपूर अल्का वाढई काँग्रेस (INC)
चंद्रपूर वरोरा अर्चना ठाकरे काँग्रेस (INC)
चंद्रपूर मूल एकता समर्थ काँग्रेस (INC)
चंद्रपूर राजुरा अरुण धोटे काँग्रेस (INC)
छत्रपति संभाजीनगर कन्नड शेख फरिनबेगम काँग्रेस (INC)
छत्रपति संभाजीनगर पैठण विद्या कावसानकर शिवसेना (SHS)
छत्रपति संभाजीनगर खुलताबाद अमीर पटेल काँग्रेस (INC)
छत्रपति संभाजीनगर गंगापूर संजय जाधव राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)
जळगाव भुसावळ गायत्री भंगाळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)
जळगाव चोपडा नम्रता पाटील शिवसेना (SHS)
जळगाव अंमळनेर परिक्षित बाविस्कर शिवसेना (SHS)
जळगाव चाळीसगाव प्रतिभा चव्हाण भाजप (BJP)
जळगाव पाचोरा सुनिता पाटील शिवसेना (SHS)
जळगाव यावल छाया पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
जळगाव फैजपूर दामिनी सराफ भाजप (BJP)
जळगाव सावदा रेणुका पाटील भाजप (BJP)
जळगाव रावेर संगिता महाजन भाजप (BJP)
जळगाव एरंडोल नरेंद्र ठाकूर भाजप (BJP)
जळगाव धरणगाव लिलाबाई चौधरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
जळगाव पारोळा चंद्रकांत पाटील शिवसेना (SHS)
जालना जालना उपलब्ध नाही उपलब्ध नाही
जालना भोकरदन समीना मिर्जा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार
जालना अंबड दिव्याणी कुलकर्णी भाजप (BJP)
जालना परतूर प्रियंका राक्षे भाजप (BJP)
धाराशिव धाराशिव नेहा काकडे भाजप (BJP)
धाराशिव परांडा जाकिर सौदागर शिवसेना (SHS)
धाराशिव भूम संयोगिता गाढवे इतर (Others)
धाराशिव कळंब सुनंदा कापसे शिवसेना (SHS)
धाराशिव तुळजापूर विनोद गंगणे भाजप (BJP)
धाराशिव नळदुर्ग बसवराज धरणे भाजप (BJP)
धाराशिव मुरुम बापूराव पाटील भाजप (BJP)
धाराशिव उमरगा किरण गायकवाड शिवसेना (SHS)
धुळे शिरपूर चिंतन पटेल भाजप (BJP)
धुळे दोंडाईचा नयन कुवर रावल भाजप (BJP)
नंदुरबार शहादा अभिजीत पाटील इतर (Others)
नागपूर सावनेर संजना मंगळे भाजप (BJP)
नागपूर उमरेड प्राजक्ता आदमने भाजप (BJP)
नागपूर काटोल अर्चना देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार
नागपूर नरखेड मनोज कोरडे भाजप (BJP)
नागपूर खापा पीयूष बुरडे भाजप (BJP)
नागपूर मोहपा माधव चर्जन काँग्रेस (INC)
नागपूर तिरोडा अशोक असाटी भाजप (BJP)
नागपूर कामठी अजय अग्रवाल भाजप (BJP)
नागपूर कळमेश्वर अविनाश माकोडे भाजप (BJP)
नागपूर रामटेक विकेंद्र महाजन शिवसेना (SHS)
नागपूर गोंदिया सचिन शेंडे काँग्रेस (INC)
नांदेड हदगाव रोहिणी वानखेडे शिवसेना (SHS)
नांदेड कंधार शहाजी नलगे काँग्रेस (INC)
नांदेड धर्माबाद संगिता बोलवार इतर (Others)
नांदेड बिलोली संतोष कुलकर्णी इतर (Others)
नांदेड देगलूर विजयमाला टेकाळे राष्ट्रवादी काँग्रेस
नांदेड मुखेड विजय देबडवार शिवसेना (SHS)
नांदेड उमरी शकुंतला मुदिराज राष्ट्रवादी काँग्रेस
नांदेड कुंडलवाडी प्रेरणा कोटलावार भाजप (BJP)
नांदेड मुदखेड विश्रांती कदम भाजप (BJP)
नाशिक मनमाड योगेश पाटील शिवसेना (SHS)
नाशिक सिन्नर विठ्ठल उगले राष्ट्रवादी काँग्रेस
नाशिक येवला राजेंद्र लोणारी राष्ट्रवादी काँग्रेस
नाशिक सटाणा हर्षदा पाटील शिवसेना (SHS)
नाशिक नांदगाव सागर हिरे शिवसेना (SHS)
नाशिक भगूर प्रेरणा बलकवडे राष्ट्रवादी काँग्रेस
परभणी गंगाखेड उर्मिला मधूसूदन केंद्रे राष्ट्रवादी काँग्रेस
परभणी सेलू मिलिंद सावंत भाजप (BJP)
परभणी जिंतूर प्रतापराव देशमुख भाजप (BJP)
परभणी मानवत राणी लाड राष्ट्रवादी काँग्रेस
परभणी पाथरी आसिफ खान शिवसेना (SHS)
परभणी सोनपेठ परमेश्वर कदम इतर (Others)
परभणी पूर्णा विमलबाई लक्ष्मणराव कदम इतर (Others)
पुणे बारामती सचिन सातव राष्ट्रवादी काँग्रेस
पुणे लोणावळा राजेंद्र सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस
पुणे दौंड दुर्गादेवी जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस
पुणे तळेगाव दाभाडे संतोष दाभाडे भाजप (BJP)
पुणे आळंदी प्रशांत कुऱ्हाडे भाजप (BJP)
पुणे इंदापूर भरत शहा राष्ट्रवादी काँग्रेस
पुणे जेजुरी जयदीप बारभाई राष्ट्रवादी काँग्रेस
पुणे जुन्नर सुजाता काजळे शिवसेना (SHS)
पुणे सासवड आनंदी जगताप भाजप (BJP)
पुणे शिरूर ऐश्वर्या पाचर्णे राष्ट्रवादी काँग्रेस
बीड बीड प्रेमलता पारवे राष्ट्रवादी काँग्रेस
बीड माजलगाव शिफा बिलाल चाऊस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार
बीड परळी वैजनाथ पद्मश्री धर्माधिकारी भाजप (BJP)
बीड अंबेजोगाई नंदकिशोर मुंदडा भाजप (BJP)
बीड गेवराई गीता पवार भाजप (BJP)
बीड धारूर बाळासाहेब जाधव भाजप (BJP)
बुलढाणा शेगाव प्रकाश शेगोकार काँग्रेस (INC)
बुलढाणा नांदुरा मंगलाताई मुऱ्हेकर भाजप (BJP)
बुलढाणा मलकापूर आतिकभाई ज्वारीवाले काँग्रेस (INC)
बुलढाणा खामगाव अपर्णा फुंडकर भाजप (BJP)
बुलढाणा मेहकर किशोर गारोळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
बुलढाणा चिखली पंडितराव देशमुख भाजप (BJP)
बुलढाणा बुलढाणा पूजा गायकवाड शिवसेना (SHS)
बुलढाणा जळगाव जामोद गणेश दांडगे भाजप (BJP)
बुलढाणा देऊळगाव राजा माधुरी शिंपणे राष्ट्रवादी काँग्रेस
भंडारा भंडारा मधुरा मदनकर भाजप (BJP)
भंडारा तुमसर सागर गभणे इतर (Others)
भंडारा पावनी विजया नंदुरकर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)
भंडारा साकोली देवश्री कापगते भाजप (BJP)
यवतमाळ यवतमाळ प्रियदर्शनी उईके भाजप (BJP)
यवतमाळ दिग्रस पंचशिला इंगोले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
यवतमाळ पुसद मोहिनी नाईक राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)
यवतमाळ उमरखेड तेजश्री जैन काँग्रेस (INC)
यवतमाळ वणी विद्या आत्राम भाजप (BJP)
यवतमाळ घाटंजी परेश केरीया काँग्रेस (INC)
यवतमाळ आर्णी नालंदा भरणे काँग्रेस (INC)
यवतमाळ दारव्हा सुनील चिरडे शिवसेना (SHS)
रत्नागिरी चिपळूण उमेश सकपाळ शिवसेना (SHS)
रत्नागिरी रत्नागिरी शिल्पा सुर्वे शिवसेना (SHS)
रत्नागिरी खेड माधवी बुटाला शिवसेना (SHS)
रत्नागिरी राजापूर हुसनबानू खलिफे काँग्रेस (INC)
रायगड खोपोली कुलदीप शेंडे शिवसेना (SHS)
रायगड उरण भावना घाणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार
रायगड पेण प्रीतम पाटील भाजप (BJP)
रायगड अलिबाग अक्षया नाईक शेतकरी कामगार पक्ष (PWP)
रायगड मुरुड जंजिरा आराधना दांडेकर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)
रायगड रोहा वनश्री शेडगे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)
रायगड श्रीवर्धन अतुल चौगुले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
रायगड महाड सुनिल कविस्कर शिवसेना (SHS)
रायगड माथेरान चंद्रकांत चौधरी शिवसेना (SHS)
लातूर उदगीर स्वाती हुडे भाजप (BJP)
लातूर औसा परवीन शेख राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)
लातूर निलंगा संजय हलगर भाजप (BJP)
लातूर अहमदपूर स्वप्निल व्हते भाजप (BJP)
वर्धा वर्धा सुधीर पांगुळ काँग्रेस (INC)
वर्धा हिंगणघाट नयना तुळसकर भाजप (BJP)
वर्धा आर्वी स्वाती गुल्हाने भाजप (BJP)
वर्धा सिंदी रेल्वे राणी कलोडे भाजप (BJP)
वर्धा पुलगाव कविता ब्राम्हणकर काँग्रेस (INC)
वर्धा देवळी किरण ठाकरे इतर (Others)
वाशिम करंजा फरिदा बानो इतर (Others)
वाशिम वाशिम अनिल केंदळे भाजप (BJP)
वाशिम मंगरुळपीर अशोक परळीकर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)
सांगली इस्लामपूर आनंदराव मलगुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार
सांगली विटा काजल म्हेत्रे शिवसेना (SHS)
सांगली अष्टा विशाल शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार
सांगली तासगाव विजया पाटील इतर (Others)
सांगली पळूस संजिवनी पुदाले काँग्रेस (INC)
सातारा सातारा अमोल मोहिते भाजप (BJP)
सातारा फलटण समशेरसिंह निंबाळकर भाजप (BJP)
सातारा कराड राजेंद्रसिंह यादव शिवसेना (SHS)
सातारा वाई अनिल सावंत भाजप (BJP)
सातारा म्हसवड पूजा विरकर भाजप (BJP)
सातारा रहिमतपूर वैशाली माने भाजप (BJP)
सातारा महाबळेश्वर सुनील शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)
सातारा पाचगणी दिलीप बगाडे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)
सिंधुदुर्ग वेंगुर्ले दिलीप गिरप भाजप (BJP)
सिंधुदुर्ग सावंतवाडी श्रद्धाराजे भोसले भाजप (BJP)
सिंधुदुर्ग मालवण ममता वराडकर शिवसेना (SHS)
सोलापूर बार्शी तेजस्वीनी कथले भाजप (BJP)
सोलापूर पंढरपूर प्रणिता भालके इतर (Others)
सोलापूर अक्कलकोट मिलन कल्याणशेट्टी भाजप (BJP)
सोलापूर करमाळा मोहिनी सावंत इतर (Others)
सोलापूर कुर्डुवाडी जयश्री भिसे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
सोलापूर सांगोला आनंदा माने शिवसेना (SHS)
सोलापूर मंगळवेढा सुनंदा आवताडे इतर (Others)
सोलापूर मैंदर्गी अंजली बाजारमठ भाजप (BJP)
सोलापूर दुधनी प्रथमेश म्हैत्रे शिवसेना (SHS)
हिंगोली हिंगोली रेखा बांगर शिवसेना (SHS)
हिंगोली बसमतनगर सुनीता बाहेती राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)
हिंगोली कळमनुरी अश्लेषा चौधरी शिवसेना (SHS)
एकीकडे महाराष्ट्रात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची प्रक्रिया चालू असताना दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचीही घोषणा केली. जानेवारी महिन्याच्या १५ तारखेला मतदान तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी व निकाल असा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला
या निवडणुकांसाठी राज्यात सध्या आघाडी, युती, पक्षप्रवेश व नाराजांची मनधरणी अशा घडामोडी सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.