नाशिकमध्ये श्रीस्वामिनारायण बहुउद्देशीय संस्कार सत्संग मंडळाची स्थापना
नाशिकमध्ये श्रीस्वामिनारायण बहुउद्देशीय संस्कार सत्संग मंडळाची स्थापना
लेवाजगत न्युज नाशिक :- येथे श्री स्वामिनारायण बहुउद्देशीय संस्कार सत्संग मंडळ, नाशिक या संस्थेची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाची स्थापना संस्थापक अध्यक्ष सद्गुरू शास्त्री श्री भक्तिप्रकाशदासजी यांच्या संकल्पनेतून करण्यात आली असून त्यांनी संस्थेचे विश्वस्त मंडळ जाहीर केले आहे. सहधर्मदाय आयुक्त कार्यालयात संस्थेची विधिवत नोंदणी करण्यात आली आहे.
या संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून त्यामध्ये सामाजिक कार्य, आध्यात्मिक प्रबोधन, शैक्षणिक मार्गदर्शन, आरोग्यविषयक उपक्रम, रोजगारविषयक प्रशिक्षण, सत्संग, प्रवचन तसेच आवश्यकतेनुसार विविध शिबिरे आयोजित करून समाजप्रबोधन करण्यात येणार आहे. बदलत्या व आव्हानात्मक काळाशी सुसंगत असे मार्गदर्शन देत आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून हरिभक्तांना परिस्थितीशी अनुरूप सक्षम बनविण्याचा मानस असल्याचे संस्थापक अध्यक्षांनी स्पष्ट केले. तसेच वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे आकलन करून त्यांची योग्य अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
भविष्यात एक हरि मंदिर उभारण्याचा मनोदयही यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रत्येक विश्वस्ताच्या कार्याचे वेळोवेळी मूल्यांकन करण्यात येईल व हे विश्वस्त मंडळ हंगामी स्वरूपाचे राहील, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या भव्य शाकोत्सव व अन्नकुट दर्शन सोहळ्याच्या प्रसंगी सद्गुरू शास्त्री श्री भक्तिप्रकाशदासजी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित हरिभक्तांना मार्गदर्शन केले. सर्व अवतारी भगवान श्री स्वामिनारायण यांच्या कृपेने व परमपूज्य धर्मधुरंदर १००८ आचार्य राकेश प्रसादजी यांच्या शुभाशीर्वादाने विश्वस्त मंडळाची घोषणा करण्यात आली.
नोंदणीकृत विश्वस्त मंडळात संस्थापक म्हणून सद्गुरू शास्त्री श्री भक्तिप्रकाश निळकंठ दासजी, अध्यक्ष प्रविण भगवान चौधरी, उपाध्यक्ष विकास हरिचंद्र चौधरी, सचिव भास्कर निळकंठ पाटील, खजिनदार संजय मधुकर भारंबे यांच्यासह विश्वस्त म्हणून हिरालाल गोविंद लोथे, दिलीप लिलाधर चौधरी, सुजित अशोक पाटील, वासुदेव मधुकर ढाके, जितेंद्र चंद्रकांत धांडे आणि हर्षल शशिकांत राणे यांचा समावेश आहे.
श्रीस्वामिनारायण बहुउद्देशीय संस्कार सत्संग मंडळाच्या स्थापनेमुळे नाशिक व परिसरातील समाजकार्य, अध्यात्म, संस्कार संवर्धन व सेवाभावी उपक्रमांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित हरिभक्तांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत