खासदार क्रीडा महोत्सव २०२५ – ‘खेलो रावेर’चा भुसावळ येथे भव्य शुभारंभ
खासदार क्रीडा महोत्सव २०२५ – ‘खेलो रावेर’चा भुसावळ येथे भव्य शुभारंभ
लेवाजगत न्युज भुसावळ:-
केंद्रीय राज्यमंत्री, युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय तथा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या पुढाकारातून आयोजित “खासदार क्रीडा महोत्सव २०२५ – खेलो रावेर” या भव्य क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ आज सेंट्रल रेल्वे ग्राउंड, भुसावळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
रावेर लोकसभा क्षेत्रातील युवक-युवतींमध्ये क्रीडासंस्कृती वृद्धिंगत व्हावी तसेच क्रीडा क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने दि. २३ ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या शुभारंभ सोहळ्याला आमदार चैनसुख संचेती, आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांच्यासह नंदकिशोर महाजन, अशोक कांडेलकर, डॉ. केतकी पाटील, गोविंद अग्रवाल, हिरालाल चौधरी, विलास चौधरी, किरण कोलते, परिक्षित बऱ्हाटे, मुरलिधर (गोलू) पाटील, सुनील महाजन, राजन लासूरकर, हरलाल कोळी, मोहन महाजन, जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव रविंद्र नाईक व जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा लक्ष्मी शंकर यादव यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, क्रीडाप्रेमी व मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते.
यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रावेर लोकसभा क्षेत्रातील खेळाडूंनी या क्रीडा महोत्सवातून आपली गुणवत्ता सिद्ध करून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. युवकांनी क्रीडा क्षेत्रात करिअर घडवावे यासाठी केंद्र सरकार व क्रीडा मंत्रालयामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
हा क्रीडा महोत्सव युवकांमध्ये आरोग्य, शिस्त, संघभावना आणि स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करण्यास निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत