पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसराच्या औद्योगिक विकासाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसराच्या औद्योगिक विकासाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रकल्पबाधितांना जास्तीत जास्त मोबदला, कौशल्य विकास केंद्र व नोकरीत प्राधान्य
लेवाजगत न्युज पुणे :-
पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक, व्यापार आणि शेती क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून राज्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) किमान दोन टक्क्यांची वाढ होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पुरंदर विमानतळ प्रकल्पामुळे बाधित सात गावांतील ग्रामस्थांशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज थेट संवाद साधला. यावेळी भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचा निर्णय, प्रकल्पबाधितांच्या मुलांना शंभर टक्के नोकरीत प्राधान्य, तसेच युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली.
मुख्यमंत्री म्हणाले की, हा केवळ प्रवासी विमानतळ नसून कार्गो विमानतळ असल्यामुळे नाशवंत मालाच्या व्यापारासाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे पुरंदर व परिसरातील नागरिकांना दीर्घकालीन लाभ होणार आहे.
महत्त्वाचे निर्णय :
भूसंपादनासाठी वाटाघाटीद्वारे दर निश्चित
प्रकल्पबाधितांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
एरोसिटी प्रकल्पात टीडीआरसह सर्व लाभ
विमानतळ परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा
पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य
पूर्वीच्या आंदोलनातील गुन्हे मागे घेणार
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती दिली, तर ग्रामस्थ प्रतिनिधींनी आपल्या मागण्या मांडल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत