Contact Banner

लेवा रत्न कवयित्री बहिणाबाई चौधरी चषक पर्व २आयोजन समितीची बैठक उत्साहात संपन्न

 

leva-ratna-kavayitri-bahinabai-chaudhari-chashak-parv-2-ayojan-samitichi-baithak-utsahat-sampann

लेवा रत्न कवयित्री बहिणाबाई चौधरी चषक पर्व २ आयोजन समितीची बैठक उत्साहात संपन्न

लेवाजगत न्युज फैजपूर:-

आगामी २४ ते २९ जानेवारी २०२६ या कालावधीत होणाऱ्या लेवा रत्न कवयित्री चषक पर्व २ अंतर्गत क्रिकेट सामन्यांच्या आयोजनाबाबत आयोजन समितीची बैठक काल येथील श्री खंडेराव मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या बैठकीत आयोजन समितीच्या वतीने  किशोर सुधाकर चौधरी यांनी माहिती देताना सांगितले की, लेवा पाटीदार समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि एकता अधिक दृढ व्हावी, तसेच समाजातील युवकांना एकत्र येण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. खेळाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी  अमोल चौधरी यांनी स्पर्धेच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती मांडली. या क्रिकेट स्पर्धेमध्ये फैजपूर, सावदा, खिरोदा, सांगवी, कळमोदा, मस्कावद व वरणगाव परिसरातील युवकांचा सक्रिय सहभाग राहणार असून, लेवा पाटील समाजातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवकांचे मनोबल वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीस विकास कोल्हे, जयेश येवले, चंदन टोके, जिग्नेश चौधरी, सुमित चौधरी, दिगंबर राणे, चिन्मय वाघुळदे, जितेंद्र वाघुळदे, भूषण धांडे, जयेश फेगडे, रोशन इंगळे, रोशन चौधरी, गिरीश पाटील, निहार पाटील, प्रथम देवकर, सांगवीचे सरपंच अतूल दादा, योगेश चौधरी तसेच परिसरातील विविध गावांतील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूणच लेवा रत्न कवयित्री बहिणाबाई चौधरी चषक पर्व २ ही स्पर्धा समाजातील एकात्मता वाढवणारी, युवकांना प्रोत्साहन देणारी आणि सामाजिक सलोखा जपणारी ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.