Contact Banner

सावदा पालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक ४ (ब) मध्ये तुल्यबळ लढत प्रचाराची रणधुमाळी शिगेला; शुक्रवार रात्री १० वाजता प्रचार बंद

 



सावदा पालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक ४ (ब) मध्ये तुल्यबळ लढत

प्रचाराची रणधुमाळी शिगेला; शुक्रवार रात्री १० वाजता प्रचार बंद


लेवाजगत न्यूज सावदा प्रतिनिधी-सावदा नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात आलेली प्रभाग क्रमांक ४ (ब) ची निवडणूक येत्या  २० डिसेंबर रोजी  घेण्यात येणार आहे. या प्रभागात सध्या चुरशीची व लक्षवेधी लढत रंगली असून मतदारांचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले आहे.


या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे विजया कुशल जावळे, तर भारतीय जनता पार्टी – शिवसेना युतीतर्फे नीलिमा किरण बेंडाळे यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे.


प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असून शुक्रवार, दिनांक १९ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता प्रचार समाप्त होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दोन्ही पक्षांनी पूर्ण ताकद लावली असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न सुरू आहेत.


भारतीय जनता पार्टी–शिवसेना युतीकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रेणुका राजेंद्र पाटील तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार व माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी हे प्रचाराची धुरा सांभाळत कमळाच्या चिन्हाचा जोरदार प्रचार करीत आहेत.


या निवडणुकीवर निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भूषण वर्मा यांचे काटेकोर लक्ष असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.


या संपूर्ण निवडणुकीचा निकाल सोमवार, दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सावदा नगरपालिकेच्या सभागृहात मतमोजणीद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. तुल्यबळ लढतीमुळे मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागणार, याबाबत सर्वत्र उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.