सावद्यात २१ रोजी निर्णायक दिवस; सकाळी १० पासून मतमोजणी, मिरवणुकीस बंदी
सावदा नगरपालिका निवडणूक : २१ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी व निकाल; पासशिवाय प्रवेश नाही, मिरवणुकीस बंदी
सावदा | प्रतिनिधी – लेवा जगत न्यूज-नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी व निकाल रविवार, दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून जाहीर करण्यात येणार आहेत. मतमोजणी प्रक्रियेसाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, मतमोजणी ठिकाणी प्रत्येक प्रभागातील उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेला अधिकृत प्रवेश पास बंधनकारक राहील. पासशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी या सूचनेची काटेकोर अंमलबजावणी करावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना योग्य सूचना द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक काळात मिरवणुकीला पूर्णतः बंदी घालण्यात आलेली असून, कोणीही मिरवणूक काढण्याचा प्रयत्न करू नये किंवा शांतता भंग होईल असे कोणतेही कृत्य करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मतमोजणी ठिकाणी भ्रमणध्वनी (मोबाईल फोन) नेण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, कोणीही मोबाईल फोन आत आणू नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
संपूर्ण निवडणूक व मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी बबन काकडे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भूषण वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तर्फे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी आवाहन केले आहे की, निवडणुकीत सहभागी सर्व उमेदवार, प्रतिनिधी, कार्यकर्ते व नागरिकांनी कोणत्याही समाजविरोधी घोषणा न देता, शांततेत व कायद्याचे पालन करत मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पाडावी. तसेच मिरवणूक काढण्याचा कोणताही प्रयत्न करू नये व शांतता भंग होईल असे कृत्य टाळावे.
आता २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या एकत्रित मतमोजणीतून सावदा शहराच्या राजकीय चित्रावर शिक्कामोर्तब होणार असल्याने नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत