योग विद्या गुरुकुल, जळगाव येथे स्थिर-सुखम आसन स्पर्धा २०२५ उत्साहात संपन्न
योग विद्या गुरुकुल, जळगाव येथे स्थिर-सुखम आसन स्पर्धा २०२५ उत्साहात संपन्न
खेमचंद पाटील (हंबर्डीकर)जळगाव -येथील योग विद्या गुरुकुल, येथे १८ डिसेंबर रोजी स्थिर-सुखम आसन स्पर्धेचे यशस्वी आयोजन विश्व मंगल योग निसर्गोपचार केंद्रमध्ये करण्यात आले. या स्पर्धेत एकूण २६ साधकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्व स्पर्धकांनी आपली योगसाधना, शारीरिक स्थैर्य, संयम व मानसिक एकाग्रतेचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शाखा प्रमुख सौ. चित्रा महाजन, सौ. हेमांगीनी सोनवणे, डॉ. भावना चौधरी, श्री. सुनील गुरव व सौ. अर्चना गुरव यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकर्ते म्हणून सौ. कविता चौधरी, सौ. नेहा तळले व रोहन चौधरी यांनी मोलाची साथ दिली.
या स्पर्धेतून राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी पुढील साधकांची निवड करण्यात आली आहे. वयोगट १२ ते १७ प्रथम क्रमांक उत्कर्ष मनोज सोनार (पुरुष) , प्रथम मोनिका नवीन चोरडिया (महिला) वयोगट १८ ते २५ प्रथम हिंदवी अनिल चौधरी (महिला) वयोगट २६ ते ४० प्रथम रचना निलेश बर्वे (महिला) वयोगट ४१ ते ५५ प्रथम सौ. कविता मनोज सोनार (महिला)
या निवड झालेल्या साधकांची पुढील राज्यस्तरीय योगासन स्पर्धा नाशिक येथील योग विद्या गुरुकुल, तळवाडे येथे आयोजित करण्यात येणार आहे.
योग ही केवळ शारीरिक क्रिया नसून आत्मविकासाची व आरोग्यपूर्ण जीवनाची साधना आहे. अशा स्पर्धांमधून साधकांमध्ये आत्मविश्वास, शिस्त व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. निवड झालेल्या सर्व साधकांना पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या असून, त्यांनी राज्यस्तरावर देखील योग विद्या गुरुकुल, जळगावचे नाव उज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत