सावदा पालिका निवडणूक : प्रभाग क्र. ४-ब मध्ये माजी नगरसेविका नीलिमा किरण बेंडाळे यांचा प्रचार जोमात
सावदा पालिका निवडणूक : प्रभाग क्र. ४-ब मध्ये माजी नगरसेविका नीलिमा किरण बेंडाळे यांचा प्रचार जोमात
सावदालेवाजगत न्यूज प्रतिनिधी-सावदा नगरपालिका निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या २० तारखेला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४-ब मध्ये भारतीय जनता पार्टी–शिवसेना युतीच्या माजी नगरसेविका नीलिमा किरण बेंडाळे यांनी प्रचाराला वेग दिला आहे. त्यांचा अनुक्रमांक दोन असून कमळ ही त्यांची निवडणूक निशाणी आहे.
माजी नगरसेविका नीलिमा किरण बेंडाळे यांनी आज आपल्या मतदारसंघात कार्यकर्ते, महिला प्रतिनिधी तसेच आप्तेष्टांसह घरोघर जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदारांना येत्या निवडणुकीत कमळ या चिन्हासमोर मतदान करण्याचे आवाहन केले.
प्रचारादरम्यान मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेक मतदारांनी त्यांना भरघोस पाठिंबा देत पुन्हा एकदा विजयी करण्याचे आश्वासन दिले आहे. या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक ४-ब मधून माजी नगरसेविका नीलिमा किरण बेंडाळे यांचा विजय निश्चित असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत