सावदा पालिकेचा उद्या फैसला; ‘कोण जिंकणार?’ यावर शहरात पैजा, नगराध्यक्ष व १० प्रभागांचे भवितव्य मतपेटीत बंद
सावदा पालिकेचा उद्या फैसला; ‘कोण जिंकणार?’ यावर शहरात पैजा, नगराध्यक्ष व १० प्रभागांचे भवितव्य मतपेटीत बंद
सावदा | प्रतिनिधी – लेवा जगत न्यूज
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा उद्या निर्णायक दिवस उजाडत असून, थेट नगराध्यक्ष पदासह दहा प्रभागांतील नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद आहे. रविवार सकाळी १० वाजेपासून मतमोजणी सुरू होत असून, त्यानंतर सावदा शहराच्या राजकीय चित्रावर शिक्कामोर्तब होणार आहे.
नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने ही लढती अत्यंत चुरशीची ठरली आहे. त्याचप्रमाणे १० प्रभागांतील ‘अ’ व ‘ब’ अशा एकूण २० नगरसेवक पदांसाठी विविध पक्षांचे व अपक्ष उमेदवार मैदानात असल्याने निकाल शेवटच्या फेरीपर्यंत उत्सुकता वाढवणार अशी आशा वर्तवली जात आहे. प्रचाराचा धुरळा खाली बसल्यानंतर आता मतमोजणीच्या निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
दरम्यान, “कोण जिंकणार?” यावर सावदा शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या आहेत. चौकाचौकांत, चहाच्या टपऱ्यांवर, बाजारपेठांमध्ये तसेच राजकीय गोटांत निकालांबाबत तर्क-वितर्क, अंदाज आणि राजकीय गणिते मांडली जात आहेत. काही ठिकाणी तर निकालाबाबत अंदाजांच्या पैजाही लागल्याचे चित्र दिसून येत असून, नागरिकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, अंतिम सत्य मतमोजणीनंतरच समोर येणार आहे.
थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांची अधिकृत यादी
- धांडे दिपाली राहुल – अपक्ष
- पाटील रेणुका राजेंद्र – भारतीय जनता पार्टी
- बडगे अलका बबन – अपक्ष
- बडगे सुभद्राबाई सिध्दार्थ – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नगरसेवक पदासाठी प्रभागनिहाय संपूर्ण उमेदवार यादी
प्रभाग क्रमांक १
जागा ‘अ’
नवाज रमजान तडवी – भाजपा
तडवी ममता रशीद – राष्ट्रवादी काँग्रेस
वारके सोनी निलेश – अपक्ष
गणेश (विशाल) भागवत सोनवणे – अपक्ष
जागा ‘ब’
कोल्हे भावना एकलव्य – भाजपा
प्राची हर्षल (शिवा) नारखेडे – अपक्ष
पाटील करुणा राहुल – अपक्ष
वानखेडे सिमरन राजेश – राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक २
जागा ‘अ’
चौधरी राजेंद्र श्रीकांत – भाजपा
फकीर अमीनशाह सुलेमानशाह – शिवसेना
वानखेडे राजेश गजानन – राष्ट्रवादी काँग्रेस
जागा ‘ब’
पठाण तबस्सुम बानो फिरोज खान – शिवसेना(बिनविरोध)
प्रभाग क्रमांक ३
जागा ‘अ’
ठोसरे गजानन नामदेव – भाजपा
तायडे उमेश प्रेमचंद – अपक्ष
तायडे विशाल प्रेमचंद – राष्ट्रवादी काँग्रेस
तायडे सचिन केशव – अपक्ष
जागा ‘ब’
तायडे सुनीता संजय – अपक्ष
भालेराव कांचन राजेंद्र – वंचित बहुजन आघाडी
शेख नुरअवजा बी सलीम – राष्ट्रवादी काँग्रेस
अरशीया अंजुम सय्यद अजहर – शिवसेना
प्रभाग क्रमांक ४
जागा ‘अ’
गाजरे जितेंद्र प्रेमचंद – अपक्ष
जंगले सुनिल (बंटी) नेमिदास – राष्ट्रवादी काँग्रेस
बेंडाळे नकुल नितीन – भाजपा
जागा ‘ब’
जावळे विजया कुशल – राष्ट्रवादी काँग्रेस
बेंडाळे नीलिमा किरण – भाजपा
प्रभाग क्रमांक ५
जागा ‘अ’
धांडे वर्षा दुर्गादास – राष्ट्रवादी काँग्रेस
नेहेते जयश्री अतुल – भाजपा
जागा ‘ब’
ब-हाटे सचिन चुडामण – भाजपा
भारंबे अजय भागवत – अपक्ष
प्रभाग क्रमांक ६
जागा ‘अ’
भंगाळे प्रतिक्षा मनिष – शिवसेना
हीना कौसर शेख जाकीर – अपक्ष
सरोदे प्रेरणा अक्षय – राष्ट्रवादी काँग्रेस
जागा ‘ब’
फिरोजखा अबदार खा – शिवसेना
वाघुळदे अंकुर प्रकाश – अपक्ष
गुलाम फरीद शेख मंजूर – राष्ट्रवादी काँग्रेस
सय्यद अनीस सय्यद कयाम – अपक्ष
सय्यद शोएब सय्यद ताहेर – अपक्ष
प्रभाग क्रमांक ७
जागा ‘अ’
भारंबे रंजना जितेंद्र – भाजपा(बिनविरोध)
जागा ‘ब’
अकोले शाम अविनाश – अपक्ष
चौधरी राजेंद्र श्रीकांत – भाजपा
चौधरी हेमंत (भैय्या) अशोक – अपक्ष
पाटील सागर विलास – अपक्ष
भंगाळे दुर्गादास (विक्की) दिगंबर – राष्ट्रवादी काँग्रेस
डॉ. भुषण दिलीप महाजन – अपक्ष
प्रभाग क्रमांक ८
जागा ‘अ’
धांडे दिपाली राहुल – अपक्ष
लोखंडे नंदाबाई मिलिंद – भाजपा
लोखंडे सिमा वेडू – राष्ट्रवादी काँग्रेस
जागा ‘ब’
येवले पंकज राजाराम – भाजपा
लोखंडे प्यारेलाल रामकृष्ण – अपक्ष
शेख चांद मोहम्मद शेख शब्बीर – राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक ९
जागा ‘अ’
चौधरी लीना संजय – अपक्ष
वानखेडे रेखा राजेश – राष्ट्रवादी काँग्रेस
वायकोळे ललिता गुणवंत – भाजपा
जागा ‘ब’
पाटील नितीन नंदकुमार – भाजपा
बढे निखील जगदीश – अपक्ष
महाजन हेमंत रुपा – राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक १०
जागा ‘अ’
रुखसार शेख सलीम अहमद पिंजारी – शिवसेना
वानखेडे रेखा राजेश – राष्ट्रवादी काँग्रेस
जागा ‘ब’
पठाण फिरोजखान हबिबुल्लाखान – शिवसेना(बिनविरोध)
निकालाची उत्सुकता शिगेला
नगराध्यक्ष पदावर कोण विराजमान होणार, कोणत्या पक्षाचे नगरपालिकेवर वर्चस्व राहणार आणि कोणते अपक्ष उमेदवार ‘किंगमेकर’ ठरणार, याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. उद्याच्या मतमोजणीनंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार असून, सावदा शहरातील राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने वळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत