Contact Banner

सावदा प्रभाग क्र. ४ मध्ये ६८.२६ टक्के मतदान; भाजपा–सेना युती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी सरळ लढत

 

savda-prabhag-kr-4-madhe-68-26-takke-matdan-bjp-sena-yuti-viruddh-rashtrawadi-congress-ajit-pawar-gat-saral-ladhat

सावदा प्रभाग क्र. ४ मध्ये ६८.२६ टक्के मतदान; भाजपा–सेना युती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी सरळ लढत

सावदा | प्रतिनिधी – लेवा जगत न्यूज-नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील पोटनिवडणूक न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवार, दि. २० डिसेंबर रोजी शांततेत पार पडली. या निवडणुकीत एकाच जागेसाठी दोन माजी नगरसेविकांमध्ये अत्यंत चुरशीची व तुल्यबळ लढत पाहायला मिळाली. या पोटनिवडणुकीत भाजपा–सेना युती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) असा थेट सामना रंगला होता.

भाजपा–सेना युतीकडून माजी नगरसेविका नीलिमा किरण बेंडाळे या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून माजी नगरसेविका विजया कुशल यांनी त्यांना कडवी टक्कर दिली. दोन्ही उमेदवार माजी नगरसेविका असल्याने त्यांचा प्रशासकीय अनुभव, स्थानिक जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे यामुळे निवडणूक अधिकच चुरशीची व रंगतदार ठरली.

या प्रभागात एकूण २,१४९ मतदार नोंदणीकृत असून, त्यापैकी १,४६७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे या पोटनिवडणुकीत ६८.२६ टक्के मतदान नोंदविण्यात आले.

मतदान केंद्रनिहाय मतदानाची आकडेवारी

प्रभाग क्र. ४/१
एकूण मतदार : ७१५
पुरुष : २५२ | महिला : २४७ | एकूण मतदान : ४९९

प्रभाग क्र. ४/२
एकूण मतदार : ७१९
पुरुष : २५७ | महिला : २६० | एकूण मतदान : ५१७

प्रभाग क्र. ४/३
एकूण मतदार : ७१५
पुरुष : २४० | महिला : २११ | एकूण मतदान : ४५१

संपूर्ण मतदान प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली.

दरम्यान, नगरपालिका पूरक हॉल येथे आज सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी ६ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून, १२ पर्यवेक्षक व सहाय्यक कर्मचारी, ६ शिपाई, तसेच १ रिटर्निंग ऑफिसर, १ तपासणी मतपत्रिका टेबल१ एक्झिट टेबल अशी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अधिकारी भूषण वर्मा हे देखरेख करणार आहेत.

मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सावदा पोलीस स्टेशन तर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून, या चुरशीच्या लढतीत कोणाच्या पारड्यात विजय पडणार याकडे उमेदवारांसह संपूर्ण सावदा शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.