सावदा पालिका निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान — रेणुका राजेंद्र पाटील यांचे नागरिकांप्रती मनःपूर्वक आभार
सावदा पालिका निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान — रेणुका राजेंद्र पाटील यांचे नागरिकांप्रती मनःपूर्वक आभार
लेवाजगत न्यूज सावदा (प्रतिनिधी):
सावदा पालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये आज पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत नागरिकांनी दाखवलेल्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल भारतीय जनता पार्टी–शिवसेना युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रेणुका राजेंद्र पाटील यांनी सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. लोकशाहीच्या सन्मानासाठी मोठ्या संख्येने मतदान करून सावदा शहराने आदर्श निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले.
रेणुका पाटील यांनी भावनिक शब्दांत शहरवासीयांचे आभार मानताना सांगितले, “प्रिय सावदावासीयांनो, आपल्या अमूल्य मतदानामुळे आपण लोकशाहीतील आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली आहे. प्रत्येक मत हा सावदा शहराच्या विकास, प्रगती आणि पारदर्शक प्रशासनावर दिलेला विश्वास आहे. आपल्या प्रेम, विश्वास आणि सहकार्याबद्दल मी मनःपूर्वक आभार मानते.”
आजच्या सकाळपासून मतदान केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. तरुण मतदारांसह ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, शिस्तबद्धरीत्या पूर्ण झाली.
रेणुका पाटील म्हणाल्या, “सावद्याला आदर्श, सुरक्षित, दर्जेदार आणि सुविधांनी समृद्ध शहर बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगार संधी, स्वच्छता, आरोग्य सुविधा, पायाभूत विकास, पाणीपुरवठा, रस्ते, प्रकाश व्यवस्था—या सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी प्रामाणिकतेने केली जाईल.”
आजच्या मतदान प्रक्रियेत योगदान देणाऱ्यांचे त्यांनी विशेष आभार व्यक्त केले:
🔸 सर्व जागरूक व जबाबदार मतदारांचे
🔸 मार्गदर्शक वरिष्ठ नेते, भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीचे पदाधिकारी
🔸 प्रचारात दिवस-रात्र परिश्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे
🔸 प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांचे
🔸 शांत व नियोजनबद्ध मतदानाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे व पोलिस दलाचे
“आपल्या विश्वासाचा मान राखण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे कार्य करू. सावदाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपला आशिर्वाद सदैव आमच्या सोबत राहो,” असा विश्वास रेणुका राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.
निवडणुकीच्या वातावरणात मतदारांनी दाखवलेल्या सक्रिय सहभागामुळे सावद्यात विकासाचा नवीन अध्याय सुरू होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत