Contact Banner

सावदा नगरपालिका प्रभाग-१ ब,च्या मतदारांचे मनःपूर्वक आभार – भावना एकलव्य कोल्हे यांची प्रतिक्रिया

 

avda-nagarapalika-prabhag-1b-matdar-abhari-bhavna-eklavya-kolhe

सावदा नगरपालिका प्रभाग १ ब च्या मतदारांचे मनःपूर्वक आभार – भावना एकलव्य कोल्हे यांची प्रतिक्रिया

लेवाजगत न्यूज सावदा (प्रतिनिधी):
सावदा नगरपालिका निवडणूक २०२५ अंतर्गत प्रभाग क्रमांक १ ब मध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीच्या अधिकृत उमेदवार भावना एकलव्य कोल्हे यांनी काल झालेल्या मतदानात मतदारांनी दाखविलेल्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. मतदानाच्या दिवशी मतदारांनी घराबाहेर पडून केलेल्या मतदानामुळे लोकशाही अधिक मजबूत झाल्याचे त्यांनी सांगितले.

भावना कोल्हे म्हणाल्या की, “मतदान ही लोकशाहीची शान आहे आणि सावदा शहरातील प्रत्येक नागरिकाने प्रभाग १ ब मध्ये मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीचा गौरव वाढविला आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमाने आणि विश्वासाने मी भारावून गेले आहे. विकासाच्या वाटचालीसाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी प्रत्येक मतदाराची मनःपूर्वक ऋणी आहे.”

युतीकडून विकासाचा संकल्प आणि सर्वधर्म समभावाने कार्य करण्याचे आश्वासन देत त्यांनी पुढे सांगितले की, प्रभाग १ ब च्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, आरोग्य सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले जातील. या कामांसाठी लवकरच नियोजन जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

त्या पुढे म्हणाल्या की, “मतदान प्रक्रियेत भाग घेताना ज्येष्ठ नागरिक, महिला, युवा मतदानदार यांनी दाखविलेला उत्साह प्रेरणादायी होता. मतदान यंत्रणेसह पोलिस प्रशासन, निवडणूक अधिकारी यांचेही मनःपूर्वक आभार.”

आगामी मतमोजणी प्रक्रियेबाबत आशावाद व्यक्त करत भावना कोल्हे यांनी सर्व समर्थक, कार्यकर्ते व नागरिकांना सकारात्मक वातावरण राखण्याचे आवाहन केले.

आगामी निकालाबाबत संपूर्ण शहरात उत्सुकता असून समर्थकांमध्ये सकारात्मक आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.