इंदोर येथील स्क्वॉश स्पर्धेत सावद्याच्या विवेक कोल्हेचा आंतरदेशीय स्तरावर प्रथम क्रमांक
इंदोर येथील स्क्वॉश स्पर्धेत सावद्याच्या विवेक कोल्हेचा आंतरदेशीय स्तरावर प्रथम क्रमांक
लेवाजगत न्यूज सावदा | प्रतिनिधी-६९ व्या स्कूल गेम्स २०२५–२०२६ अंतर्गत इंदोर येथे पार पडलेल्या स्क्वॉश क्रीडा स्पर्धेत सावदा येथील श्री आ. गं. हायस्कूल व श्री ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी चि. विवेक प्रविण कोल्हे (इयत्ता १२ वी, विज्ञान) याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघाने आंतरदेशीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून राज्याचे व शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
विवेक कोल्हे याने या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या या यशामुळे सावदा शहरासह संपूर्ण तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशाबद्दल शाळेच्या वतीने मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक तसेच क्रीडा विभागाने त्याचे कौतुक केले आहे.
या यशामागे विवेकचे सातत्यपूर्ण सराव, कष्ट, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व कुटुंबीयांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला आहे. त्याच्या या घवघवीत यशाबद्दल विवेक कोल्हे, त्याचे कुटुंबीय, मार्गदर्शक शिक्षक व शालेय व्यवस्थापन यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देण्यात येत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत