उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सावदा येथे विज्ञान प्रदर्शन; Agruculture Waste Project ला प्रथम क्रमांक
उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सावदा येथे विज्ञान प्रदर्शन; Agruculture Waste Project ला प्रथम क्रमांक
लेवाजगत न्यूज सावदा : उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सावदा येथे काल भव्य विज्ञान प्रदर्शन पार पडले. या विज्ञान प्रदर्शनात विद्या विकास मंडळ संचलित एस. पी. राणे विद्यालय व खिर्डी कनिष्ठ महाविद्यालय, खिर्डी खुर्द येथील प्राध्यापक श्री. संतोष भाऊलाल पाटील यांनी Agruculture Waste Project सादर केला. त्यांच्या अभिनव सादरीकरणाला उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला व या प्रकल्पाला तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष ॲड. श्री. संदीपदादा भंगाळे, उपाध्यक्ष श्री. विलासदादा पाटील, चेअरमन डॉ. श्री. सुनील कोल्हे तसेच सर्व मान्यवर पदाधिकारी यांनी प्रा. श्री. संतोष भाऊलाल पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी वर्ग यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
सत्कार कार्यक्रमात वरिष्ठ शिक्षक श्री. जे.बी. फेगडे सर, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. वाय. बी. नेरकर यांनी केले.
प्रकल्पाच्या माध्यमातून “मातीचे प्रदूषण रोखण्यासाठी सेंद्रीय खताचा वापर वाढवा” असा संदेश प्रा. संतोष भाऊ पाटील सरांनी उपस्थितांना दिला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत