मायादेवी कृष्णा बाऱ्हे यांची वाघोदा-थोरगव्हाण गटातून इच्छुक उमेदवारीची जोरदार चर्चा
मायादेवी कृष्णा बाऱ्हे यांची वाघोदा-थोरगव्हाण गटातून इच्छुक उमेदवारीची जोरदार चर्चा
लेवाजगत न्यूज सावदा प्रतिनिधी-
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाघोदा-थोरगव्हाण जिल्हा परिषद गटातून माजी पंचायत समिती उपसभापती मायादेवी कृष्णा बाऱ्हे यांचे नाव प्रबळ इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. राजकीय क्षेत्रात १९९५ पासून कार्यरत असलेल्या बाऱ्हे यांनी उदळी गावच्या सरपंचपदापासून सुरुवात करत रावेर पंचायत समितीच्या उपसभापती पदापर्यंतचा प्रवास यशस्वीरित्या पार पाडला आहे.
उदळी (ता. रावेर) येथील रहिवासी असलेल्या बाऱ्हे यांनी ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण व सामाजिक उपक्रमांत नेहमीच अग्रणी भूमिका निभावली आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामांना गती मिळाली होती, तसेच जनसंपर्क आणि लोकसहभागातून त्यांनी मजबूत नेतृत्व सिद्ध केले आहे.
वाघोदा-थोरगव्हाण गटात त्यांच्या प्रभावी नेतृत्वाची छाप असल्यामुळे त्यांची पुन्हा इच्छुक उमेदवारी जाहीर झाल्यास निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, “मायादेवी ताई बाऱ्हे या सुशिक्षित, अनुभवी, जनसंपर्क असलेल्या नेत्या आहेत. सर्वसामान्यांसाठी सदैव काम करणारी नेतृत्वशैली त्यांच्यात आहे. त्यांच्या निवडीने गटाचा सर्वांगीण विकास होईल,” अशी चर्चा परिसरात रंगात आहे.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत