उरणच्या भेंडखळ बीपीसीएल मार्गावर अनधिकृत पार्किंग प्रशासनाची मात्र अळी मिळी गुप चिळी
उरणच्या भेंडखळ बीपीसीएल मार्गावर अनधिकृत पार्किंग प्रशासनाची मात्र अळी मिळी गुप चिळी
उरण : सुनिल ठाकूर-स्थानिक वाहतूक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने उरणच्या भेंडखळ गाव ते बी पी सी एल मार्गावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत टँकर वैगरेची मोठ्या प्रमाणात पार्किंग होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. या बेकायदा पार्किंग बाबत पोलिस यंत्रणेने आज सकाळी कारवाईचे दिलेले आश्वासन मात्र हवेत विरले आहे. ही अशा प्रकारे दोन लाईन लावून केल्या जाणाऱ्या पार्किंगमुळे एखादा मोठा अपघात घडल्यावरच प्रशासन झोपेच्या सोंगातून जागे होणार आहे का असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात सिडकोचा रस्ता थेट बेकायदा पार्किंग साठी वापरण्यात येत असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशी वाहनांना याचा फटका बसत आहे. या पार्किंग वाल्यांनी केवळ एकच लेन इतर वाहनांसाठी खुली ठेवली आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याचा धोका बळावलेला आहे.
उरण तालुक्यात प्रशासन आणि नागरिक यांच्यात काही तालमेळच बसत नसल्याचे तालुक्यातील नागरिक सातत्याने अनुभवीत आहेत. तालुका भरातील अनधिकृत पार्किंग बाबत नागरीक सातत्याने आवाज उठवत आहेत मात्र तो प्रशासना पर्यंत पोहोचतच नसल्याचे दिसून येत आहे. रस्तो रस्ती अगदी काजवीच्या झाडांप्रमाणे उगवत अडलेल्या नव नव्या ढाब्यांच्या निमित्ताने रस्त्यावर गाड्या पार्किंग होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. याचाच अतिरेक म्हणजे भेंडखळ ते बी पी सी एल मार्गावर बी पी सी एल प्रकल्पात जाणारे टँकर बेधडकपणे दोन लेन प्रमाणे पार्किंग केले जात आहेत. त्यामुळे हा रस्ता नेमका नागरिकांच्या वाहतुकीसाठी आहे की येथील कंपन्यांमध्ये येणाऱ्या गाड्या रस्त्यावर पार्क करण्यासाठी आहे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. विशेष म्हणजे या गाडी वाल्यांकडे विचारणा केली.असता त्यांच्या कडून कोणीतरी पार्किंग फी देखील वसूल करीत असल्याची सनसनाटी माहिती हाती आली आहे. या संदर्भात पोलिस मात्र एकदम अनभिज्ञच असल्याचे दिसून आले आहे. येथील पार्किंगचे फोटो दाखवून देखील वाहतूक पोलिस किंवा पोलिस यांच्याकडून कोणतीच कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे यंत्रणा देखील या अनधिकृत पार्किंग वाल्यांच्या पुढे हतबल आहे का असा प्रश्न या ठिकाणी विचारला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत