Contact Banner

फैजपूरमध्ये रंगणार भक्तिरसाचा महोत्सव; श्री संगीत रामायण कथेला ४ जानेवारीपासून सुरुवात

 

शैलेंद्र शास्त्री (श्रीक्षेत्र नैमिषारण्य)

फैजपूर येथे ४ जानेवारीपासून श्री संगीत रामायण कथा व नामसंकिर्तन महोत्सव

फैजपूर लेवाजगत न्यूज प्रतिनिधी:- फैजपूर येथे दि. ४ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत श्रीखंडोबावाडी मंदिराच्या पाठीमागील परिसरात श्री संगीत रामायण कथा व नामसंकिर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत सामुदायिक तुलसी अर्चन, विठ्ठल नामजप, रामायण कथा, हरिपाठ व कीर्तन सेवा होणार आहे.

महोत्सवाच्या पूर्वसंध्येला शनिवार दि. ३ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत वैकुंठवासी नथ्थूसिंगबाबा राजपूत दौरा मंडळाच्या सप्ताहानिमित्त शोभायात्रा काढण्यात येणार आहे. दि. ११ जानेवारी रविवार रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

दररोज सकाळी काकडा आरती, विष्णू सहस्रनाम, सामुदायिक तुलसी अर्चन व नामजप, दुपारी श्री संगीत रामायण कथा तसेच सायंकाळी हरिपाठ व कीर्तन सेवा होणार आहे. रामायण कथेचे वक्ते परमपूज्य शैलेंद्र शास्त्री (श्रीक्षेत्र नैमिषारण्य) असणार आहेत.

दि. ९ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण माझी माऊली युट्युब चॅनलवरून करण्यात येणार आहे.

या धार्मिक सोहळ्यात फैजपूर शहर व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती, फैजपूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.