वीर वाजेकर महाविद्यालयात जागतिक मृदा दिन साजरा
वीर वाजेकर महाविद्यालयात जागतिक मृदा दिन साजरा
लेवाजगत न्यूज उरण :सुनिल ठाकूर -रयत शिक्षण संस्थेचे, वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, फुंडे येथील रसायनशास्त्र विभाग प्राणिशास्त्र विभाग आणि इन्क्युबेशन सेलच्या यांच्या संयुक्त सहयोगाने जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून श्री. शुभम गटकळ ( सर्कल कृषी अधिकारी, उरण)श्री. सुयोग कुलकर्णी (खेत आधार, डोंबिवली)हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. आमोद ठाक्कर होत. उपप्राचार्य डॉ. अनिल पालवे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. त्यांनी जागतिक मृदा दिनाचे महत्व व इतिहास नमूद केला.
मुख्य अतिथी श्री. शुभम गटकळ आणि श्री. सुयोग कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना माती प्रदूषण, माती विश्लेषणाचे महत्त्व आणि शाश्वत कृषी पद्धती यांविषयी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्र. प्राचार्य डॉ. आमोद ठाक्कर यांनी माती परीक्षणाचे शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित केले. आपण सर्व पोषणासाठी मातीवर अवलंबून आहोत आणि दिवसेंदिवस आपण मातीवर अतिक्रम करून तिचे आरोग्य धोक्यात आणत आहोत. आपण आज माती संवर्धन साठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे व त्यासाठीच माती परिक्षण उपक्रम महाविद्यालयाने हाती घेतल्याचे नमूद केले.
या निमित्ताने रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी हॅन्ड्स-ऑन प्रशिक्षण घेतले. विद्यार्थ्यांनी एकूण १४० मातीचे नमुने तपासून माती स्वास्थ्य कार्ड (Soil Health Card) तयार केली. हे प्रशिक्षण प्रा. डॉ. स्मिता तांदळे आणि इन्क्युबेशन सेलचे समन्वयक डॉ. गुरुनीत वाधवा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन व सल्ले दिले.
या कार्यक्रम प्रसंगी डॉ. आर. बी. पाटील (IQAC समन्वयक), डॉ. श्रेया पाटील, डॉ. धरती घरत, प्रा. चेतना तुमडे व इतर प्राध्यापक यांनी सक्रिय सहभाग घेऊन उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत