उत्कृष्ट क्रीडा शिक्षक सेवेसाठी युवराज शंकर चौधरी यांचा गौरव
उत्कृष्ट क्रीडा शिक्षक सेवेसाठी युवराज शंकर चौधरी यांचा गौरव
लेवा जगत न्यूज प्रतिनिधी कल्याण-विद्यार्थ्यांमध्ये खेळाची गोडी निर्माण करून क्रीडा संस्कृती रुजवण्यात मोलाचे योगदान देणारे क्रीडा शिक्षक युवराज शंकर चौधरी यांचा सन्मान सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, ठाणे विभागाचे जिल्हाध्यक्ष व मुंबई विभाग संपर्क प्रमुख प्रमोद वाघमोडे यांच्या शुभहस्ते हा सन्मान करण्यात आला.
युवराज शंकर चौधरी यांनी आपल्या अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण केली असून शालेय तसेच तालुका व जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धांचे यशस्वी नियोजन केले आहे. क्रीडा क्षेत्रातील विविध संस्थांना योग्य मार्गदर्शन देत त्यांनी अनेक उपक्रम यशस्वी करून दाखवले. त्यांच्या निष्ठावान, परिश्रमी व सातत्यपूर्ण कार्यामुळे ठाणे जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रातील लौकिक अधिक उंचावला असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
त्यांच्या क्रीडा व सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत उत्कृष्ट व उल्लेखनीय क्रीडा शिक्षक सेवा या गौरवासाठी त्यांना शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान त्यांच्या कार्याची पावती असून नव्या पिढीला खेळाकडे प्रेरित करण्याच्या त्यांच्या कार्याला अधिक बळ देणारा ठरला आहे.
या गौरवाबद्दल युवराज शंकर चौधरी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत