Contact Banner

“आवडीचे क्षेत्र निवडा आणि त्यातच शिक्षण घ्या, तर यश नक्की”-आर्यन पाटील

aryan-patil-paris-ecole-des-beaux-arts-selection


“आवडीचे क्षेत्र निवडा आणि त्यातच शिक्षण घ्या, तर यश नक्की”-आर्यन पाटील

लेवाजगत न्यूज सावदा : येथील माजी विद्यार्थी चिरंजीव आर्यन नंदकिशोर पाटील यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक निवड झाल्याबद्दल गुरुकुल संस्थेतर्फे त्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.

यावेळी संस्थेचे संचालक पी. डी. पाटील, प्राचार्य संजय वाघुळदे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आर्यन पाटील सध्या येथे शिल्पकलेच्या मास्टर डिग्रीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. मास्टर डिग्रीच्या दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरसाठी स्टुडन्ट एक्सचेंज प्रोग्रामअंतर्गत त्याची फ्रान्समधील पॅरिस येथील जगप्रसिद्ध या संस्थेत पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे. ८ जानेवारी २०२६ रोजी तो फ्रान्सला रवाना होणार आहे.

या पार्श्वभूमीवर आयोजित सत्कारप्रसंगी आर्यनने विद्यार्थ्यांसमोर आपल्या कलेचा प्रवास उलगडला. “आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा आणि मनाला रुचेल त्याच क्षेत्रात शिक्षण घ्या, तरच खऱ्या अर्थाने प्रगती साधता येते,” असा संदेश देत त्याने विद्यार्थ्यांना प्रेरित केले. स्वतःच्या अनुभवातून विविध उदाहरणे सांगत त्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष शास्त्री स्वामी भक्तीप्रकाशदासजी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत आर्यनच्या यशाचे कौतुक केले व त्याला शुभाशीर्वाद दिले.

उल्लेखनीय बाब म्हणजे, आर्यन पाटील हा आ. गं. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथील कलाध्यापक नंदू पाटील यांचा सुपुत्र आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.