खेडीत शालेय विदयार्थ्यांची नेत्रतपासणी व चष्मे वाटप
खेडीत शालेय विदयार्थ्यांची नेत्रतपासणी व चष्मे वाटप
लेवाजगत न्यूज जळगाव - येथील अनामिका प्रतिष्ठान तर्फे जिल्हा परिषद शाळा, खेडी येथे विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर यशस्वीपणे राबवण्यात आले. श्री साई नेत्र चिकित्सालयचे नेत्ररोग तज्ञ डॉ. योगेश टेणी यांनी सुमारे १५० विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली. शिबिरा दरम्यान अनेक विद्यार्थ्यांचे दृष्टिदोष आढळून आलेत.गरजू विद्यार्थ्यांना अनामिका प्रतिष्ठानच्या वतीने मोफत चष्मे वितरीत करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक मनोहरबाविस्कर,प्रतिष्ठानचे सचिव प्रमोद माळी, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदा कोळी यांनी तर आभार प्रदर्शन शितल चौधरी यांनी मानले. शिबिराच्या यशस्वितेसाठी ज्ञानेश्वर चौधरी,अरुण चौधरी,तारावंती नन्नवरे,देविदास पाटील,राणी काळे इत्यादिनी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत