बैलोंडाखार येथे शेतकऱ्यां साठी बायोचार निर्मिती आणि वापर प्रशिक्षण शिबीर संपन्न
बैलोंडाखार येथे शेतकऱ्यां साठी बायोचार निर्मिती आणि वापर प्रशिक्षण शिबीर संपन्न
उरण: सुनिल ठाकूर -बायोचार शेतीसाठी एक वरदान:
कृषी विभागाचा पुढाकार: श्री . शिवाजी आमले साहेब, विभागीय कृषी सहसंचालक ठाणे, यांचे सूचने नुसार व श्रीम.अर्चना सुळ, नारनवर तालुका कृषी अधिकारी, उरण यांच्या अध्यक्षतेखाली ,जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन
शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवावी, या उद्देशाने बेलोंडेखार या गावामध्ये शेतकऱ्यांसाठी 'बायोचार' (Biochar) निर्मिती आणि वापराबाबत विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना टाकाऊ कचऱ्यापासून उपयुक्त खत कसे तयार करावे, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमाला कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये:
श्रीमती आर. टी. नारनवर (तालुका कृषी अधिकारी)श्रीमती ए.डी.बुरकुल (उप कृषी अधिकारी) सहाय्यक कृषी अधिकारी, विभावरी चव्हाण. BTM नमिता वाकळे, गावचे पोलीस पाटील, दत्ताराम गोंधळी, तसेच गटाने शेती करणाऱ्या महिला शेतकरी उपस्थित होत्या.
बायोचार: काळाची गरज या
प्रशिक्षणाचे सहाय्यक कृषी अधिकारी विभावरी चव्हाण व BTM नमिता वाकळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी बायोचार म्हणजे काय, याची सविस्तर माहिती दिली. "पीक कापणीनंतर उरलेला कचरा न जाळता, त्यापासून शास्त्रीय पद्धतीने बायोचार तयार केल्यास जमिनीला कर्ब (Carbon) मिळतो आणि पाण्याची धारण क्षमता वाढते," असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रशिक्षणातील महत्त्वाचे मुद्दे:
बायोचारचे फायदे: जमिनीचा पोत सुधारणे, सूक्ष्मजीवांची वाढ होणे आणि रासायनिक खतांवरील खर्च कमी होणे.
निर्मिती पद्धती: शेतातील काडीकचरा, पिकांचे अवशेष यांचा वापर करून कमी ऑक्सिजनमध्ये ते जाळून कोळसा (बायोचार) तयार करण्याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
वापर: हे खत पिकांना कशा प्रकारे द्यावे, याचे तांत्रिक नियोजन समजावून सांगितले.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. तसेच शेतकऱ्यांनी ही आम्ही ह्या खरीप ला नक्कीच बायोचार चा उपयोग करू अशी ग्वाही दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत