Contact Banner

वापी चनोद कॉलनी मध्ये भव्य श्री शिवमहापुराण कथा सप्ताहाचे आयोजन


 वापी चनोद कॉलनी मध्ये भव्य श्री शिवमहापुराण कथा सप्ताहाचे आयोजन


लेवाजगत न्यूज वापी गुजरात:-


श्री शिवमहापुराण कथा सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले असून भाविकांसाठी ही एक मोठी आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे. दिनांक 18 जानेवारी 2026 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत हा शिवमहापुराण कथा सप्ताह संपन्न होणार आहे.


या कथेसाठी परमपूज्य कथा वाचक ह.भ.प. अरुण शास्त्रीजी (शिवमहापुराण कथावाचक) हे उपस्थित राहून शिवमहापुराणाचे रसाळ व भक्तिरसपूर्ण कथाकथन करणार आहेत.


कथाकाळ दररोज दुपारी 3.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत राहणार असून 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8.00 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.


या कथा सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम, अभिषेक, आरती तसेच विशेष पूजन विधी पार पडणार आहेत. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवकृपा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


दिननिहाय कथा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :


दि. 18-01-2026 (रविवार) : श्री शिवमहापुराण मंगल कथा


दि. 19-01-2026 (सोमवार) : शिवलिंगाची महिमा उत्पत्ती


दि. 20-01-2026 (मंगळवार) : भस्म रुद्राक्षाची महिमा


दि. 21-01-2026 (बुधवार) : नारी महिमा, सृष्टी वर्णन


दि. 22-01-2026 (गुरुवार) : गंगा अवतरण, समुद्र मंथन, अधिमास कथा


दि. 23-01-2026 (शुक्रवार) : सती चरित्र, शिव-पार्वती विवाह


दि. 24-01-2026 (शनिवार) : कार्तिक गणेश जन्म, तारकासुर वध


दि. 25-01-2026 (रविवार) : दुर्वासा, हनुमान अवताराची कथा


दि. 26-01-2026 (सोमवार) : ज्योतिर्लिंग, शिव पंचाक्षर महिमा व जालंधर वध, अंधकासुर वध

कथा स्थळ:-गोकुळ धाम,कृष्णा पार्क,आशापुरा जवळ,चनोद कॉलनी वापी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.