धनाजी नाना महाविद्यालयात सात दिवसीय श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचा समारोप उत्साहात
धनाजी नाना महाविद्यालयात सात दिवसीय श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचा समारोप उत्साहात
लेवाजगत न्यूज | फैजपूर :
येथील च्या (एनएसएस) विभागाच्या वतीने आयोजित सात दिवसीय श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचा (दि. ०७ ते १३ जानेवारी २०२६) समारोप समारंभ उत्साहात पार पडला. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी तापी परिसर विद्यामंडळ, फैजपूरचे सहसचिव प्रा. नंदकुमार भंगाळे होते.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे, कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सतीश दत्तात्रय पाटील, प्रा. विकास वाघुळदे, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सविता कलवले तसेच अंधार मळी येथील पोलीस पाटील रमजान तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरादरम्यान उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल केतन महाजन, सानिया सरफराज व नयना पाटील यांची उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून निवड करून त्यांचा गौरव करण्यात आला. स्वयंसेवक प्रतिनिधी केतन महाजन व जयश्री करंडे यांनी मनोगतातून शिबिरातील अनुभव कथन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नयना पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सानिया सरफराज यांनी मानले. प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सतीश दत्तात्रय पाटील यांनी केले. प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विशद करून स्वयंसेवकांनी समाजासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
अध्यक्षीय समारोपात प्रा. नंदकुमार भंगाळे यांनी विद्यार्थ्यांनी सामाजिक भान जपत राष्ट्रउभारणीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. विवेक महाजन, प्रा. रमेश वाघ, प्रा. नरेंद्र वाघोदे तसेच सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत