Contact Banner

यावल उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सईदाबी मो. याकुब यांनी भाजपाचा ४ मतांनी केला पराभव, तिरंगी लढतीत १२ मते घेत झाल्या विजयी

 

yaval-upnagaradhyaksh-nivad-congress-saidabi-moh-yakub-bjp-parabhav


यावल उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सईदाबी मो. याकुब यांनी भाजपाचा ४ मतांनी केला पराभव, तिरंगी लढतीत १२ मते घेत झाल्या विजयी

अतुल पाटील यांचा पुन्हा मास्टर स्टोक,स्विकृत म्हणुन पालिकेत केली एन्ट्री

लेवाजगत न्यूज यावल : नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची निवड गुरूवारी पार पडली.यात भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट व कॉग्रेस अशी तिरंगी लढत येथे बघायला मिळाली. या मध्ये कॉग्रेसच्या सईदाबी मोहंमद याकुब यांनी महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांच्या मदतीने १२ मते मिळवत भाजपाच्या उमेदवाराचा ४ मतांनी पराभव केला तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराला एका अपक्षा सह ४ मते मिळाली तसेच स्विकृत सदस्य म्हणुन माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी पालिकेत एन्ट्री केली असुन भाजपा कडून उमेश फेगडे देखील स्विकृत म्हणुन सभागृहात दाखल झाले आहे.

यावल नगर परिषदेत गुरूवारी उपनगराध्यक्ष पदासाठीची निवड लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात भाजप,कॉग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. 

    भाजप कडून रुबाब मंहम्मद तडवी,राष्ट्रवादी अजित पवार गटच्या अंजुम बी कदीर खान तर कॉग्रेसच्या सहिदाबी मोहम्मद याकूब यांनी अर्ज दाखल केले होते व अर्ज छाणणी नंतर सभागृहात हात उंच करून मतदान प्रक्रीया घेण्यात आली या मध्ये कॉग्रेसच्या सईदाबी मो.याकुब यांना कॉग्रेसचे ६, महाविकास आघाडीच्या मित्र पक्ष उबाठाचे नगराध्यक्षसह तीन व एक अपक्ष असे १२ मते मिळाली तर भाजपाला आपल्याकडे एक ही अपक्ष वळवता आला नाही त्यांना त्यांच्या गटातील ८ मते मिळाली व त्यांचा ४ मतांनी पराभव झाला. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला पक्षाचे तीन व एक अपक्ष असे ४ मते मिळाली होती. तेव्हा या निवडणुकीत उपनगराध्यक्ष म्हणुन सईदा बी यांची निवड जाहिर होताचं जल्लोश करण्यात आला. या निवड प्रसंगी मुख्याधिकारी निशीकांत गवई, सहायक मुख्याधिकारी रविकांत डांगे, पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील, कक्ष अधीक्षक विशाल काळे, संग्राम शेळके सह नगरपालिकेचे विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तर नगराध्यक्ष छायाताई पाटील यांनी व नगर परिषद प्रशासनाकडून उपनगराक्षांचा सत्कार करण्यात आला. उपनगराध्यक्ष सहिदा बी या काँग्रेसच्या शहराध्यक्ष शेख हकीम मोहम्मद याकुब यांच्या आई आहेत.

स्विकृत म्हणुन घेतली एन्ट्री.

या वेळी भाजपाकडून नगर पालिकेचे माजी गटनेता उमेश फेगडे व कॉग्रेस कडून माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची देखील स्विकृत नगरसेवक म्हणुन निवड जाहिर झाली. व या दोघांना नगर परिषदेत दिमाखदार पणे एन्टी घेतली आहे.

धनंजय चौधरीकडून सत्कार.    

काँग्रेस पक्षाचे यावल शहराध्यक्ष माे. हकीम शेठ यांच्या मातोश्री सईदा बी यांची उपनगराध्यक्षा पदी निवडीबद्दल कॉग्रेसचे माजी आमदार शिरिष चौधरी यांचे सुपूत्र एनएसयुआयचे राज्य सरचिटणीस धनंजय चौधरी यांनी सईदाबी व मो.हकीम शेठ यांचे अभिनंदन केले.या निवडीत सर्व धर्मीय नगरसेवकांनी सामंजस्याने, एकोपा व सद्भावनेने सहभाग नोंदवत सुंदर उदाहरण घातले आहे.एकसंघ पाठिंब्यामुळे शहर विकासाला नवीन गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

अतुल पाटील यांची रणनीती यशस्वी..

 नगर पालिकेत महाविकास आघाडीचे नऊ नगरसेवक निवडून आले होते. त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ६ सदस्य व शिवसेना उबाठा गटाचे नगराध्यक्ष सह तीन नगरसेवक निवडून आले होते. हे दोन्ही गट एकत्र येऊन नऊ नगरसेवकांच्या गटाची एकत्र नोंदणी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे करतील असे वाटत होते. मात्र जिल्हाधिकारी यांच्याकडे गटाची नोंदणी करताना आघाडीचे नेते अतुल पाटील यांनी रणनीती आखत तीन अपक्ष नगरसेवक त्यांच्याकडे वळविले. व त्यापैकी दोन सदस्यांचा समावेश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गटात सामील करून त्या गटाची संख्या ८ करून घेतली. व शिवसेना उ.बा.ठा. गटात तीन सदस्य असताना त्या गटात अपक्ष नगरसेवक पराग सराफ यांचा समावेश करून उबाठाच्या ४ सदस्यांचा गट स्थापन करून घेतला.

    अशाप्रकारे महाविकास आघाडीचे एकत्रित संख्या १२ झाली.तेव्हा उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ४ व भाजपाचे ८ नगरसेवक जरी एकत्र जरी झाले असते तरी त्यांची संख्या १२  इतकी झाली असती. असे झाले असता दोघी उमेदवारास सम समान मते पडली असती. समसमान मते झाल्यास लोकनियुक्त नगराध्यक्ष यांना अतिरिक्त मतदान करण्याचा अधिकार असल्याने उपाध्यक्ष महाविकास आघाडीचा झाला असता. अशी रणनीती अतुल पाटील यांनी आखली होती. ही खेळी यशस्वी झाली अशी चर्चा दिवसभर शहरात रंगली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.