एकनाथ शिंदेंचा धक्कादायक दावा | “फडणवीसांनी ठाकरेंना 50 फोन केले”
एकनाथ शिंदेंचा धक्कादायक दावा | “फडणवीसांनी ठाकरेंना 50 फोन केले”
लेवाजगत न्युज मुंबई:- मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट देखील केला. "छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामूला पक्षात घेतलं. तिकीट दिलं. काय चालू आहे? त्यांनी काय-काय केलंय ते आपल्याला माहिती आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर देवेंद्रजी ह्यांना उलटं टांगून फटके दिले असते. दिले असते की नाही?", अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
"काही जण निवडणुका आल्या की पार इतिहासात जातात. सातवीचं पुस्तक उघडतात. सूर्याची पिसाळ, अब्दाली, अफलज खान, त्यांना सर्व आठवतं. बाळासाहेबांचे विचार जपणारा सूर्याजी पिसाळ आहे की त्यांच्या विचारांचा मारेकरी सूर्याजी पिसाळ? लोकांना माहिती आहे. म्हणून ज्यांनी विचार सोडले, भाजपच्या पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला, 50 फोन देवेंद्र फडणवीस यांनी केले याचा मी साक्षीदार आहे", असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला.
"ज्या देवेंद्र फडणवीस यांना मी सांगितलं, विनंती केली, त्यामुळे मागचा महापौर कसा झाला तो माहिती आहे. आतल्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती नसतील. पण त्या माणसाचा तुम्ही फोन घेऊ शकत नाहीत. तुम्ही ठरवलं होतं की, काय करायचं. सत्तेसाठी लाचार झाले म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची माळ तोडली. जनतेला माहिती आहे कोण खरा सूर्याजी पिसाळ. कारण जनतेने पाहिलं आहे की, खुर्चीसाठी काय-काय केलंय", अशी टीका त्यांनी केली.
'तुमच्यासारखे लाचार होणार नाही', शिंदेंची टीका
"आम्ही कायम बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही जे धाडस केलं ते आपल्याला माहिती आहे. आम्ही कुणाची सत्ता घेऊन गेलो नाही. सत्तेवरुन पायउतार होऊ गेलो. आमच्या मंत्रिपदावर पाणी सोडून गेलोय. फक्त आणि फक्त आणि बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणून आणि शिवसेनेचे खच्चीकरण केलं म्हणून आम्ही हे केलं. आम्ही जीव गेला तरी तुमच्यासारखे लाचार होणार नाही", असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत