भुसावळ बस स्थानक परिसरात भर रस्त्यात कारने घेतला अचानक पेटक्षणातच धुराचे लोळ, नागरिकांची धावपळ; कार पूर्णपणे जळून खाक
भुसावळ बस स्थानक परिसरात भर रस्त्यात कारने घेतला अचानक पेटक्षणातच धुराचे लोळ, नागरिकांची धावपळ; कार पूर्णपणे जळून खाक
लेवाजगत न्युज जळगांव (जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे):-
भुसावळ शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात आज अचानक घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली. पेट्रोल भरून निघालेल्या एका कारने अचानक भर रस्त्यातच पेट घेतला, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चालक पेट्रोल भरून कार घेऊन निघाला असता काही अंतरावरच कारमधून अचानक धूर येऊ लागला. प्रसंगावधान राखत चालकाने तात्काळ कार रस्त्याच्या कडेला उभी केली. काही क्षणांतच कारने भीषण स्वरूपाचा पेट घेतला.
कार पेटताच परिसरात मोठी गर्दी जमली, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली.
मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक बिघाड किंवा शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली, मात्र पोलिस व अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत