आंदोलनात २,५७१ जणांचा मृत्यू; अमेरिकेचा थेट हस्तक्षेपाचा इशारा, परिस्थिती चिघळली : इराणमधील भारतीयांना तात्काळ देश सोडण्याचे आवाहन
परिस्थिती चिघळली : इराणमधील भारतीयांना तात्काळ देश सोडण्याचे आवाहन
आंदोलनात २,५७१ जणांचा मृत्यू; अमेरिकेचा थेट हस्तक्षेपाचा इशारा
तेहरान/नवी दिल्ली – मधील बिघडत चाललेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ने इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचे आवाहन केले आहे. भारतीय विद्यार्थी, पर्यटक तसेच व्यावसायिकांनी अत्यंत आवश्यक नसल्यास इराणमध्ये थांबू नये आणि आंदोलनग्रस्त भागांपासून दूर राहावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाने तीव्र आणि हिंसक स्वरूप धारण केले असून सुरक्षा दलांकडून आंदोलकांवर जोरदार कारवाई केली जात असल्याचे वृत्त आहे. या आंदोलनात आतापर्यंत २,५७१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे. हजारो आंदोलकांना अटक करण्यात आली असून परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे.
दरम्यान, ने इराण सरकारला आंदोलकांविरोधातील हिंसक कारवाई तात्काळ थांबवण्याचे आवाहन केले आहे.
आंदोलकांना लढा सुरू ठेवण्याचे रझा पहलवी यांचे आवाहन
इराणमधील आंदोलकांना मिळणाऱ्या आंतरराष्ट्रीय समर्थनाच्या पार्श्वभूमीवर राजघराण्याचे वारसदार यांनी आंदोलकांना संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.
अमेरिकेकडून मदत लवकरच मिळेल, असे यांनी यापूर्वी केलेले वक्तव्य पहलवी यांनी पुन्हा अधोरेखित केले.
याच दरम्यान, अमेरिकेने इराणसोबत सुरू असलेली सर्व चर्चा थांबवल्याचे जाहीर केले आहे. आंदोलकांविरोधात हिंसाचार सुरू राहिल्यास अमेरिका थेट हस्तक्षेप करेल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला होता. इराणवर लष्करी किंवा कठोर कारवाई करण्याचा पर्याय विचाराधीन असल्याचे त्यांनी मंगळवारी सांगितले.
(AP) वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २,५७१ इतकी आहे.
तुरुंगातील आंदोलकांना तातडीने शिक्षा द्या – इराणचे कायदेप्रमुख
इराणचे कायदेप्रमुख यांनी तुरुंगात असलेल्या आंदोलकांना लवकरात लवकर शिक्षा सुनावून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
“उशीर केल्यास त्याचा काहीही उपयोग होणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.
मानवाधिकार कार्यकर्त्यांनी अटक करण्यात आलेल्या अनेक आंदोलकांना फाशीची शिक्षा होण्याची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर आलेल्या या वक्तव्यामुळे देशात पुन्हा मोठ्या प्रमाणात आंदोलन भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिकास्थित मानवाधिकार संघटना ने आंदोलनात २,५७१ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला असून, इराण सरकारनेही २,००० हून अधिक मृत्यू झाल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे.
अमेरिका हल्ला करणार असेल तर लष्करी तळांवर प्रतिहल्ला – इराणचा इशारा
इराणने आजूबाजूच्या देशांना कडक इशारा देत स्पष्ट केले आहे की, अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यास शेजारील देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर थेट हल्ले करण्यात येतील.
यासंदर्भात वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत