Contact Banner

गोदावरी स्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाचे शानदार उद्घाटन

 


गोदावरी स्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाचे शानदार उद्घाटन

लेवाजगत न्युज जळगाव :- गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, जळगाव येथे वार्षिक क्रीडा सप्ताहाचे शानदार उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.

यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सदस्य व हृदयरोगतज्ञ डॉ. वैभव पाटील तसेच महादेव हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ञ डॉ. सिद्धेश्वर पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनाने झाली. क्रीडा ध्वज व क्रीडाज्योत प्रज्वलन करून क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.

ग्रीन, ब्ल्यू, येलो व रेड हाऊसच्या विद्यार्थ्यांनी मनमोहक नृत्य सादर केले. इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘आय लव्ह स्पोर्ट्स’ या संकल्पनेवर आधारित फॉर्मेशन डान्स व कराटे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी रस्सीखेच स्पर्धा घेण्यात आली असून विजेत्या संघास मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करत खेळातून शिस्त, संघभावना व नेतृत्वगुण विकसित होतात, असे मत व्यक्त केले.

या क्रीडा सप्ताहात कबड्डी, खो-खो, धावणे, लांब उडी, गोळाफेक, क्रिकेट, बुद्धिबळ आदी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन शाळेच्या प्राचार्या सौ. नीलिमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक व सर्व शिक्षकवृंदाने परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.