जळगावच्या २६ वर्षीय तरुणाचा अमेरिकेत मृत्यू उणे तापमानात वाढला होता रक्तदाब
जळगावच्या २६ वर्षीय तरुणाचा अमेरिकेत मृत्यू उणे तापमानात वाढला होता रक्तदाब
लेवाजगत न्युज जळगाव:- जळगावच्या रामानंदनगर परिसरातील अर्णव सराफ शास्त्रीनगरात राहणारा व सध्या अमेरिकेच्या हार्वर्ड येथे वास्तव्यास असलेला अर्णव सुबोध सराफ (क्य २६) या तरुणाचा उणे तापमानात रक्तदाब वाढल्याने मृत्यू झाला.
गुरुवारी तेथील संध्याकाळी ६ ते ७वाजेदरम्यान व भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजता त्याचे निधन झाले. त्याच्यावर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी त्याचे आई-वडील रवाना झाले आहेत. मूळजी जेठा महाविद्यालयातील प्रा. डॉ. शमा सराफ व जैन उद्योग समूहातील निवृत्त अधिकारी सुबोध सराफ यांचा धाकटा मुलगा अर्णव दोन वर्षांपासून अमेरिकेत हार्वर्ड येथे डाटा सायन्स विषयात एमएसचे शिक्षण घेत होता. गुरुवारी सकाळी कुटुंबीयांना त्याच्या वसतिगृहातील सूत्रांनी घटनेची माहिती दिली.
या घटनेमुळे सराफ कुटुंबीयांवर शोककळा पसरली. - त्यांना भेटून सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी सर्वच क्षेत्रातील मंडळींनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, अर्णवचे आई-वडील जळगावहून बायरोड छत्रपती संभाजीनगर व तेथून विमानाने मुंबई व तेथून आंतरराष्ट्रीय विमानाने अमेरिकेत जाणार असल्याचे अर्णवचे मामा प्रसाद जगताप यांनी सांगितले.
अर्णव याला उच्च रक्तदाबाचा त्रास
अर्णव याला उच्च रक्तदाबाचा विकार होता. गेल्या वर्षीही त्याला उणे तापमानात असाच त्रास होऊ लागल्याने तो भारतात घरी परत आला होता. यंदाच्या थंडीतही कुटुंबीय त्याला घरी येण्याबाबत बोलत होते. मात्र, तो काही त्रास होणार नाही असे त्याने दोन दिवसांपूर्वी सांगितले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत