पुलावरून दुचाकी खाली कोसळून पती जागीच ठार ,पत्नी आणि मुलगीही गंभीर जखमी
पुलावरून दुचाकी खाली कोसळून पती जागीच ठार ,पत्नी आणि मुलगीही गंभीर जखमी
लेवाजगत न्युज जळगाव:- जामनेर येथून नातेवाइकांच्या उत्तर कार्यावरून जळगावात घरी परतत असताना दुचाकीला तालुक्यातील चिंचोली गावाजवळ पुलावर अपघात झाला. त्यात चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तिघे जण दुचाकीसह थेट पुलाखाली दुचाकीचालक पतीचा जागीच मृत्यू झाला तर त्याची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाले.
त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरण उर्फ राजू लक्ष्मण चव्हाण (वय ४०, रा. कोल्हेवाडा, जळगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो आई, मोठा भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी यांच्यासह राहत होता. शहरातील आठवले हॉस्पिटल येथे गेल्या ३० वर्षांपासून तो कामाला होता. गुरुवारी जामनेर येथे नातेवाइकांच्या उत्तरकार्याला सकाळी पत्नी व मुलीसह दुचाकीवर गेला होता.
उत्तरकार्याचे काम आटोपून जळगाव येथे घरी दुचाकीने परतत असताना हा अपघात झाला. किरण यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी पुलाखाली कोसळली. या भीषण अपघातात किरण गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याची पत्नी हर्षदा (वय ३५) व मुलगी अस्मी (वय १३) हे गंभीर जखमी झाले आहेत. ग्रामस्थांनी तातडीने जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले तर मृत किरण याला जीएमसी रुग्णालयात पोहोचवले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत