Contact Banner

जे.टी.महाजन पॉलिटेक्निकमध्ये ३० वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांची भावनिक पुनर्भेट

 

jt-mahajan-polytechnicmadhe-30-varshannantar-maji-vidyarthyancha-bhavanik-punarbhet

जे.टी.महाजन पॉलिटेक्निकमध्ये ३० वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांची भावनिक पुनर्भेट

फैजपूर लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-

जे. टी. महाजन पॉलिटेक्निक, फैजपूर येथे तब्बल ३० वर्षांपूर्वी शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी कॉलेजला भेट देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे या माजी विद्यार्थ्यांपैकी काही जामनगर, अहमदाबाद व राजकोट (गुजरात) येथून खास फैजपूर येथे दाखल झाले होते.

माजी विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थीदशेतील कॉलेजचे स्वरूप, त्या काळातील शिक्षणपद्धती आणि आज कॉलेजमध्ये झालेल्या भरीव प्रगतीवर मनमोकळा संवाद साधला. “आमच्या काळात कॉलेज कसं होतं आणि आज अत्याधुनिक सुविधा, सुसज्ज प्रयोगशाळा पाहून अभिमान वाटतो,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

कॉलेजचे प्राचार्य  पी. एम. राणे यांनी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना संपूर्ण कॉलेजची पाहणी करून दिली. यावेळी त्यांनी विद्यमान विद्यार्थ्यांना व माजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचाल, करिअर नियोजन आणि समाजाप्रती जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले.

या भेटीदरम्यान माजी विद्यार्थ्यांनी कॉलेजमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांसोबत जुन्या आठवणी शेअर केल्या. कॉलेजमधील शिस्त, संस्कार आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच आज आम्ही विविध क्षेत्रात यशस्वी झालो, असे मत माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

जामनगर, अहमदाबाद आणि राजकोट येथून आलेल्या या माजी विद्यार्थ्यांच्या भेटीमुळे कॉलेज परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ही भेट कॉलेज व माजी विद्यार्थ्यांमधील घट्ट नातं आणि संस्थेचा शैक्षणिक वारसा अधोरेखित करणारी ठरली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.