Contact Banner

सावदा येथे श्रीमद् भागवत कथा पारायणाचे आयोजन

 

savda-yethe-shrimad-bhagwat-katha-parayanache-ayojan

सावदा येथे श्रीमद् भागवत कथा पारायणाचे आयोजन

लेवाजगत न्यूज सावदा -येथे त्रिमूर्ती मुंजोबावाडी सप्ताह समिती तर्फे भव्य श्रीमद् भागवत कथा पारायण आयोजित करण्यात आले आहे. ही कथा दिनांक २३ जानेवारी (शुक्रवार) पासून दररोज संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार असून, कथेचे वक्ते शास्त्री अनंत प्रकाश दासजी असणार आहेत. कथा दिनांक २९ जानेवारी (गुरुवार) रोजी समाप्त होईल.

कथेचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे :

  • २३ जानेवारी (शुक्रवार) – संध्याकाळी ७.०० वाजता दीपप्रज्वलन
  • २४ जानेवारी (शनिवार) – रात्री ९.३० वाजता विदुर चरित्र
  • २५ जानेवारी (रविवार) – रात्री ९.३० वाजता वामन जन्म
  • २६ जानेवारी (सोमवार) – रात्री ९.३० वाजता श्रीकृष्ण जन्म
  • २७ जानेवारी (मंगळवार) – रात्री ९.३० वाजता दही मंथन
  • २८ जानेवारी (बुधवार) – रात्री ९.३० वाजता रुक्मिणी विवाह
  • २९ जानेवारी (गुरुवार) – रात्री ९.३० वाजता सुदामा चरित्र
    • रात्री १०.०० वाजता कथा समाप्ती

तसेच ३० जानेवारी (शुक्रवार) रोजी सकाळी ८.३० ते १०.०० या वेळेत प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.

या श्रीमद् भागवत कथा पारायणाचा लाभ घेण्यासाठी सावदा शहर व परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्रिमूर्ती मुंजोबावाडी सप्ताह समिती तर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.