Contact Banner

ज्येष्ठ तारपा वादक भिकल्या धिंडा यांना पद्मश्री जाहीर


jyeshtha-tarpa-vadak-bhiklya-dhinda-yanna-padma-shri-jahir


 ज्येष्ठ तारपा वादक भिकल्या धिंडा यांना पद्मश्री जाहीर

लेवाजगत न्युज:-

आदिवासी संस्कृतीचा आणि वारली कलेचा अविभाज्य भाग असलेल्या 'तारपा' वाद्याला आपल्या श्वासाने जिवंत ठेवणारे, पालघर जिल्ह्याचे सुपुत्र भिकल्या लाडक्या धिंडा यांना केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठेचा 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा होताच पालघर जिल्ह्यात आणि कला विश्वात आनंदाची लाट पसरली आहे.

​वारली संस्कृतीचा जागतिक सन्मान भिकल्या धिंडा हे पालघर जिल्ह्यातील डहाणू/जव्हार पट्ट्यातील रहिवासी आहेत. 

भिकल्या धिंडा यांच्या घराण्यात तारपा वादनाचा वारसा गेल्या साधारण १५० वर्षांपासून जपला जात आहे. त्यांचे आजोबा नवसू धाकल्या धिंडा आणि वडील लाडक्या धाकल्या धिंडा हे देखील उत्कृष्ट तारपा वादक होते. हाच वारसा भिकल्या यांनी केवळ जपला नाही, तर तो सातासमुद्रापार पोहोचवला. औपचारिक शिक्षण नसतानाही केवळ कलेवरच्या निष्ठेपोटी त्यांनी तारपा हे वाद्य जागतिक नकाशावर नेले. वयाच्या १२ व्या वर्षापासून सुरू झालेली ही ओढ आज ९२ व्या वर्षीही तितकीच तरुण आहे. 

गेल्या अनेक दशकांपासून ते 'तारपा' या पारंपरिक आदिवासी वाद्याच्या माध्यमातून वारली संस्कृतीची सेवा करत आहेत.

"तारपा हेच माझे दैवत आहे," असे भिकल्या धिंडा अत्यंत अभिमानाने सांगतात. त्यांच्या या निस्सीम सेवेची दखल घेत भारत सरकारने त्यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे.

​भिकल्या धिंडा हे वारली आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर येत त्यांनी आपली कला जोपासली आहे.

​तारपा हे वाजवण्यासाठी अत्यंत कठीण असे वाद्य मानले जाते, ज्यासाठी प्रचंड दमसासाची (Breath control) गरज असते. भिकल्या धिंडा हे वयोवृद्ध असूनही आजही तितक्याच ताकदीने आणि तन्मयतेने तारपा वादन करतात.

​ केवळ वादनच नव्हे, तर नवीन पिढीला हे वाद्य शिकवून ही कला लुप्त होऊ नये यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांनी अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय महोत्सवात आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे.

​आदिवासींच्या हृदयाची स्पंदने

​तारपा हे केवळ एक वाद्य नसून ती वारली समाजाची ओळख आहे. सुकलेला भोपळा, बांबू आणि ताडाच्या पानांपासून हे वाद्य बनवले जाते. दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या आदिवासी नृत्यांमध्ये तारपा वादनाला अनन्यसाधारण महत्त्व असते.

तारपा हे प्रामुख्याने वारली, कातकरी, ठाकर, कोकणा अशा आदिवासी जमातींकडून वाजवलं जाणारं फुंकर वाद्य आहे.

तारपा वाजवताना नाच, फेर, सामूहिक हालचाल होते.

वारली नृत्याची सुरुवातच अनेकदा तारपाने होते.

हे वाद्य निसर्ग, जीवनचक्र आणि एकात्मतेचं प्रतीक मानलं जातं.

भिकल्या धिंडा हे महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध व मान्यताप्राप्त तारपा वादक आहेत.

ते वारली आदिवासी समाजातील आहेत.

तारपा वादनाला त्यांनी कला, ओळख आणि अभिमान मिळवून दिला.

त्यांच्या वादनात निसर्गाची लय, आदिवासी जीवनाची ऊर्जा आणि परंपरेचा आत्मा जाणवतो

त्यांनी महाराष्ट्रासह देश-विदेशातही वारली संगीत व तारपा वादन सादर केले आहे.

अनेक तरुण आदिवासी कलाकारांना प्रेरणा दिली

वारली संस्कृती जपण्याचं काम आयुष्यभर केलं.

तारपा म्हणजे आदिवासी संस्कृतीचा श्वास

भिकल्या धिंडा म्हणजे त्या श्वासाला जगासमोर नेणारा कलाकार...

 भिकल्या धिंडा यांच्या रूपाने आज याच परंपरेचा गौरव झाला आहे.

​पालघर जिल्ह्यात जल्लोष

भिकल्या धिंडा यांचे नाव पद्म पुरस्कारांच्या यादीत झळकताच त्यांच्या गावात ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. "हा केवळ भिकल्या दादांचा सन्मान नसून, हा संपूर्ण आदिवासी संस्कृतीचा आणि कष्टकरी कलाकारांचा सन्मान आहे,"

तारपा वादक भिकल्या धिंडा यांनी देशातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक समजला जाणारा पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आदिवासी संस्कृतीचे मानबिंदू ,संवर्धक आणि संवाहक वारली चित्रकार पद्मश्री जिव्या  सोमा म्हसे यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारे भिकल्या धिंडा हे जिल्ह्यातील दुसरे आदिवासी रत्न आहेत.

राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष सोहळ्यात भिकल्या धिंडा यांना हा 'पद्मश्री' प्रदान करून गौरविण्यात येईल.

तारपा वादनातून आदिवासी समाजाची संस्कृती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वृद्धींगत संवर्धित केल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!!!

लेखक

श्रीराम साहेबराव महाजन

कलाशिक्षक

चेंबूर कर्नाटका हायस्कूल, चेंबूर, मुंबई ७१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.