Contact Banner

कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई तर्फे पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन


 कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई तर्फे पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन


लेवाजगत न्युज उरण: सुनिल ठाकूर

 नवी मुंबई येथील कलासाधना सामाजिक, संस्था तर्फे दिनांक ०८ मार्च २०२६ रोजी, जागतिक महिला दिनानिमित्त 'सिंधुताई सपकाळ नारी शक्ती गौरव पुरस्कार, सिंधुताई सपकाळ जीवन गौरव पुरस्कार, भारत भूषण पुरस्कार' (पुरुष बांधवांसाठी) प्रदान करण्यात येणार आहेत. पुढील क्षेत्रातील व्यक्ती आपला प्रस्ताव पाठवू शकतात. वैयक्तिक, शिक्षण, शिक्षक, प्राध्यापक, खेळ, कला, चित्रपट, चित्रपटगृह, लिटरेचर, राजकारण, सामाजिक, चित्रकार, इतिहास, बँकिंग, वित्त, प्रेस, मीडिया, वैद्यकीय, लेखक, कवी, कलाकार, ललित कला, आरोग्य सेवा इतर क्षेत्रातील मान्यवर आपले नामांकन ७२०८१०१५८२ या क्रमांकावर पीडीएफ स्वरूपात पाठवण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात येत आहे. पुरस्कार स्वरूप आकर्षक स्मृतिचिन्ह / सन्मानपत्र / पुस्तक / आकर्षक मेडल इ. पुरस्कार स्वरूप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.


पुरस्कारांसाठी आपले प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात येत आहे. या पुरस्कारांसाठी आपण आपले प्रस्ताव पाठवू शकतात. प्रस्ताव/नामांकन पाठवण्याची अंतिम दि.२० फेब्रुवारी २०२६ ही असेल. त्यानंतर येणारे प्रस्ताव/नामांकन पुरस्कारांसाठी विचारात घेतले जाणार नाहीत असे संस्थे तर्फे सांगण्यात येत आहे. नामवंत आणि प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. पुरस्कारासाठी निवड झालेल्यानंतर त्याबाबत माहिती देण्यात येईल. जास्तीत जास्त मान्यवरांनी या पुरस्कारासाठी आपला अर्ज करावा. असे आयोजकांमार्फत आव्हान करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.