Contact Banner

कोचूर बु. येथील डॉ. युक्ता पाटील यांची एम.डी. रेडिओलॉजीसाठी निवड

 

kochur-budruk-dr-yukta-patil-md-radiology-nivad

कोचूर बु. येथील डॉ. युक्ता पाटील यांची एम.डी. रेडिओलॉजीसाठी निवड

कोचूर बु., ता. रावेर (वार्ताहर) — येथील डॉ. युक्ता नंदकिशोर पाटील यांची कोल्हापूर येथील येथे एम.डी. (रेडिओलॉजी) अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.

कोचूर बु. येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर कडू दीपचंद पाटील यांच्या नात आणि स्वर्गीय नंदकिशोर कडू पाटील यांच्या कन्या असलेल्या डॉ. युक्ता पाटील यांनी एम.बी.बी.एस. परीक्षेत स्वर्णपदक प्राप्त केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशानंतर आता एम.डी. रेडिओलॉजीसाठी त्यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे निवड झाल्याने परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या निवडीबद्दल गोपाळ पाटील, एम. के. पाटील, मोहन पाटील, मिलिंद पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी डॉ. युक्ता पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच चे रावेर तालुका अध्यक्ष रविंद्र महाजन यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.