जळगांव महापालिका निवडणुकीत माघारींचा धडाका; शिवसेनेने तीन जागा बिनविरोध केल्या ५६ उमेदवारांची पहिल्याच दिवशी माघार, प्रमुख पक्षांचे अधिकृत उमेदवारही रिंगणाबाहेर
महापालिका निवडणुकीत माघारींचा धडाका; शिवसेनेने तीन जागा बिनविरोध केल्या
५६ उमेदवारांची पहिल्याच दिवशी माघार, प्रमुख पक्षांचे अधिकृत उमेदवारही रिंगणाबाहेर
शहर प्रतिनिधी | लेवाजगत न्यूज
महापालिका निवडणुकीत माघारीच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी राजकीय घडामोडींना वेग आला. स्वीकृत सदस्यत्वाचे गाजर दाखवत सत्ताधारी ने तब्बल तीन जागा बिनविरोध करून घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. दिवसभरात एकूण ५६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, विशेष म्हणजे यात केवळ अपक्षच नव्हे तर प्रमुख पक्षांचे अधिकृत उमेदवारही सहभागी आहेत.
(उबाठा) कडून प्रभाग ७ (क) मधून सागर पाटील तर प्रभाग १८ (अ) मधून मयूर सोनवणे यांनी माघार घेतली. तसेच च्या ममता बाविस्कर यांनी प्रभाग १५ (ब) मधून उमेदवारी अर्ज मागे घेतला.
दरम्यान, भाजप आमदार यांच्या पत्नी सीमा भोळे यांनी प्रभाग ७ (अ) मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र गुरुवारी दुपारी त्यांनीही अर्ज मागे घेतल्याने राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
आकडेवारी काय सांगते?
महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १,०३८ अर्जांपैकी छाननीअंती ९०३ अर्ज वैध ठरले होते. सध्या ६९६ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे उर्वरित काही तासांत आणखी किती उमेदवार माघार घेतात आणि कोणते राजकीय सौदे घडतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. शेवटच्या दिवशी मनधरणी व दबावतंत्राचे नाट्य पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुरुवारी माघार घेतलेल्या प्रमुख उमेदवारांची यादी
गुरुवारी माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये सपना सपकाळे (प्रभाग १ क, अपक्ष), भरत कर्डिले (१ ड), सपना सूर्यवंशी (२ क), खुशबू बनसोडे व कीर्ती सनकत (४ अ), स्वप्निल चौधरी, युवराज सोनवणे, भावेश पाटील (४ क), सईदाबी पिंजारी (४ क, समाजवादी पार्टी), मुकुंदा सोनवणे (४ ड), राजेश दोशी (५ ड), कुणाल मोरे (६ ड), सीमा भोळे (७ अ), सविता बोरसे व प्रज्ञा असोदेकर (७ ब), महेश वर्मा, सागर पाटील, राजेंद्र पाटील (७ क), सचिन बाविस्कर (७ ड), राहुल लोखंडे (९ अ), प्रतिभा पाटील (९ ब), वंदना पाटील (११ अ), सुरेखा व नितीन तायडे (१२ अ), मंदाकिनी जंगले, वैशाली पाटील, दीपाली पानपाटील (१२ क), गिरीश भोळे (१२ ड), अजित राणे, महेश कापुरे (१३ अ), प्रीती सपके, दीपिका पाटील (१३ ब), योगेश लाडवंजारी (१४ अ), इकबाल पिरजादे (१४ ड), स्वप्निल चौधरी, गौरव शिरसाळे (१५ अ), नाजमीन पटेल, यशोदा बोंडे, श्रद्धा जोशी, ममता बाविस्कर (१५ ब), रेखा पोपटाणी, नंदा दर्जी (१५ क), ललित नारखेडे, किरण पाटील, दीपक अत्तरदे (१६ अ), साधना रोटे, पूजा सरोदे, रूपाली सोनार (१६ क), महेश चौधरी (१६ ड), मो. नसीबदारा पिरजादे (१७ क), शाह सगीर अहमद शब्बीर (१७ ड), मयूर सोनवणे (१८ अ) आणि पूजा पाटील (१९ अ) यांचा समावेश आहे.
पुढे काय?
माघारींच्या या लाटेमुळे काही प्रभागांतील लढती एकतर्फी होण्याची शक्यता असून, बिनविरोध जागांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. अंतिम मुदतीपर्यंत कोणते नवे राजकीय डावपेच समोर येतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
— लेवा जगत न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत