महाराष्ट्र धडाडीच्या नेतृत्वाला मुकला
महाराष्ट्र धडाडीच्या नेतृत्वाला मुकला
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूची बातमी ही अत्यंत धक्का देणारी आहे. संपूर्ण महाराष्ट्रच या घटनेने शोकसागरात बुडाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजकारणातील स्पष्टवक्ता आणि धडाडीचे नेतृत्व होते. चार दशकापासून त्यांनी राज्याच्या राजकारणावर ठसा उमटविला होता. अनेक राजकीय कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांची ज्यावेळी भेट व्हायची त्यावेळी जळगाव जिल्ह्यातील शेती, सहकार याविषयी नेहमीच ते माहिती घ्यायचे. सकाळी 6 वाजता सर्वसामान्यांना भेटणारा नेता म्हणजे अजित पवार. प्रशासनावर पकड असलेले नेते म्हणून दादांची ओळख होती. शेतकर्यांसाठी संघर्ष यात्रेचे नेतृत्व त्यांनी केले होते. अजितदादांच्या निधनाचे वृत्त हे मनाला चटका लावणारे असून राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दादांसारखे नेतृत्व पुन्हा होणे नाही.
- डॉ. उल्हास पाटील, माजी खासदार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत