Contact Banner

पळासखेडे (मिराचे) येथे हुतात्मा दिनानिमित्त कृषी दूतांकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर


 पळासखेडे (मिराचे) येथे हुतात्मा दिनानिमित्त कृषी दूतांकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर



लेवाजगत न्युज जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 

हुतात्मा दिनाच्या पवित्र निमित्ताने पळासखेडे (मिराचे), ता. जामनेर, जि. जळगाव येथे शुक्रवार, दि. 30 जानेवारी 2026 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे शिबिर जि. प. प्राथमिक शाळा, पळासखेडे (मिराचे) येथे सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत पार पडले.

सदर सामाजिक उपक्रमाचे आयोजन डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील अंतिम वर्षातील कृषी दूतांमार्फत करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. एस. देवरे, कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम. गोनशेटवाड तसेच प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या आरोग्य तपासणी शिबिरासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिराचे उद्घाटन सरपंच श्री. संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी दूत पार्थ भदाणे यांनी केले. यावेळी कृषी दूत अमीन मुजावर यांनी आरोग्य विषयक महत्त्व पटवून देणारे मनोगत व्यक्त केले.

या शिबिरामध्ये गावातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या उपक्रमाला युवकांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आरोग्याबाबत जनजागृती व तपासणी यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी कृषी दूत महेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कृषी दूत पार्थ भदाणे, महेश पाटील, अमन मोगल, अमीन मुजावर व रोशन नरोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.