पूजाताई नितीन खडसे यांचा लेवा पाटीदार भ्रातृ मंडळाकडून ‘लेवा महिला कर्तृत्व गौरव २०२६’ पुरस्काराने सन्मान
पूजाताई नितीन खडसे यांचा लेवा पाटीदार भ्रातृ मंडळाकडून ‘लेवा महिला कर्तृत्व गौरव २०२६’ पुरस्काराने सन्मान
लेवजगत खेमचंद पाटील-लेवा पाटीदार भ्रातृ मंडळ, वाकड यांच्या वतीने आयोजित भव्य सत्कार सोहळ्यात सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल यांना ‘लेवा महिला कर्तृत्व गौरव २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून , (अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य), , तसेच यांची उपस्थिती लाभली. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पूजाताई खडसे यांनी सामाजिक सेवेच्या माध्यमातून महिलांच्या मूलभूत गरजा ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य केले आहे. त्यांच्या कार्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून स्थानिक समाजाला नवी दिशा मिळाली आहे. आजवरच्या सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.
समाजकल्याणासाठी केलेल्या त्यांच्या प्रयत्नांना या पुरस्काराने योग्य मान्यता मिळाली आहे. युवकांसाठी प्रेरणादायी उपक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेला नवे परिमाण दिले आहे.
यावेळी लेवा पाटीदार भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष म्हणाले, “महिलांच्या सामाजिक योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘लेवा महिला कर्तृत्व गौरव’ हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. आज सन्मानित झालेल्या सर्व पुरस्कारार्थींचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. भविष्यातही अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
पुरस्कार स्वीकारताना पूजाताई खडसे म्हणाल्या, “हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून, माझ्यासोबत कार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि संपूर्ण समुदायाचा आहे. भविष्यातही सामाजिक सेवेचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा माझा संकल्प आहे.”

कोणत्याही टिप्पण्या नाहीत