Contact Banner

सावद्यात अपक्ष आघाडी गटास जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता; सुनीता तायडे गटनेत्या

 

yashasvi-shastrakriya-51-varshiya-rugna-cancer-mukt-tajnya-upachar-disha


सावद्यात अपक्ष आघाडी गटास जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता; सुनीता तायडे गटनेत्या

सावदा लेवाजगत न्यूज प्रतिनिधी –

सावदा नगरपरिषदेत अपक्ष नगरसेविका सुनीता संजय तायडे व अपक्ष नगरसेवक गणेश उर्फ विशाल भागवत सोनवणे यांनी स्वतंत्रपणे अपक्ष आघाडी गट स्थापन केला असून, या गटास जिल्हाधिकारी, जळगाव यांनी अधिकृत मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण अर्हता नियम १९८७ व महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ६३ (२)(ब) अन्वये सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून, सदर गटाची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे.

या नव्याने स्थापन झालेल्या अपक्ष आघाडी गटाच्या गटनेतेपदी सुनीता संजय तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सावदा नगरपरिषदेतील राजकीय समीकरणांमध्ये नव्याने हालचाली निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.