Contact Banner

डंपरची दुचाकीला जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, चालक फरार


डंपरची दुचाकीला जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, चालक फरार

लेवाजगत न्युज जामनेर | प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील शहापूर धरण परिसरात आज सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव डंपरने दुचाकीस्वार तरुणाला जोरदार धडक दिल्याने या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर तरुण दुचाकीवरून जात असताना वेगाने आलेल्या डंपरने त्याला धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत तरुण हा फत्तेपूर पिंपरी (ता. जामनेर) येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. फरार डंपर चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.