सावदा येथे संगीतमय श्रीमद् रामायण कथा उत्साहात सुरू १७ ते २५ जानेवारीदरम्यान दररोज कथाश्रवण; विविध प्रसंगांचे सजीव देखावे
सावदा येथे संगीतमय श्रीमद् रामायण कथा उत्साहात सुरू
१७ ते २५ जानेवारीदरम्यान दररोज कथाश्रवण; विविध प्रसंगांचे सजीव देखावे
लेवाजगत न्यूज सावदा : शहरात भक्तीमय वातावरण निर्माण करत संगीतमय श्रीमद् रामायण कथेचा शुभारंभ दिनांक १७ जानेवारी रोजी झाला आहे. ही कथा दिनांक १७ ते २५ जानेवारी दरम्यान दररोज सायंकाळी ७ ते रात्री १०.३० या वेळेत माळीवाडा गवत बाजार, सावदा येथे आयोजित करण्यात आली आहे. या भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन यांच्या वतीने करण्यात आले आहे. कथेचे वक्ता श्री सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिराचे शास्त्री भक्तीप्रियदासजी असून ते आपल्या वाणीतून हरिभक्तना कथा श्रवण करतील.
कथेचा पहिला दिवस अत्यंत भक्तिभावात पार पडला असून, रविवार हा कथेचा दुसरा दिवस ठरला. या रामायण कथेत केवळ कथाकथन नव्हे, तर विविध प्रसंगांचे सजीव देखावे सादर करून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध करण्यात येत आहे.
कथाक्रम पुढीलप्रमाणे सादर केला जाणार आहे —
- दिनांक १९ जानेवारी, सोमवार : शिव–पार्वती विवाह (सजीव देखावा)
- दिनांक २० जानेवारी, मंगळवार : श्रीराम जन्मकथा
- दिनांक २१ जानेवारी, बुधवार : सीता स्वयंवर
- दिनांक २२ जानेवारी, गुरुवार : श्रीराम वनवास
- दिनांक २३ जानेवारी, शुक्रवार : शबरीची बोर व बाली युद्ध
- दिनांक २४ जानेवारी, शनिवार : रामेश्वर ज्योतिर्लिंग स्थापना
- दिनांक २५ जानेवारी, रविवार : रामराज्याभिषेक
या संगीतमय श्रीमद् रामायण कथेचे प्रभावी वक्ते म्हणून दररोज भाविकांना कथाश्रवण घडवणार आहेत. त्यांच्या ओघवत्या व भावस्पर्शी कथनशैलीमुळे परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
या भक्तीमय कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सावदा शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत