मुलांचा शा.वै म.नादेंड, मुलींमध्ये डीयुपीएमसी जळगाव गोदावरी क्रिकेट लिगचे विजेते
मुलांचा शा.वै म.नादेंड, मुलींमध्ये डीयुपीएमसी जळगाव गोदावरी क्रिकेट लिगचे विजेते
लेवाजगत न्यूज जळगाव - येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन गोदावरी क्रिकेट लीग सामन्यात मुलांचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय नांदेडचा संघ विजेता तर डियुपीएमसी अर्थात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा संघ उपविजेता ठरला. अंतीम सामन्यात ४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवत डियुपीएमसी संघाचा पराभव केला.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित प्रकाशझोतातील गोदावरी क्रिकेट लीग स्पर्धेचे उद्घाटन संस्थाध्यक्ष माजी खा. उल्हास पाटील, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड,डॉ. वर्षा पाटील, डॉ. चैतन्य पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत,डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य आर के मिश्रा,आशिष भिरूड यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयातील मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण ४० संघ सहभागी झाले होते.
अंतीम सामना रंगला
या स्पर्धेतील अंतीम सामना डियूपीएमसी विरूध्द शासकिय वैद्यकिय महाविद्यालय नादेंड यांच्यात प्रकाशझोतात खेळवण्यात आला.या अंतीम सामन्यात शासकिय वैद्यकिय महाविद्यालय नादेंड यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा ४ धावांनी पराभव केला. विजयानंतर शा.वै.महाविद्यालय नांदेड गोदावरी क्रिकेट लिग चषकाचे मानकरी ठरले. तर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय हा उपविजेता ठरला.तसेच उत्कृृष्ट गोलंदाज म्हणून दिपेश येसनासुरे तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून वेद भुषण खरोडे, उकृष्ट क्षेत्ररक्षक अभिराज फल्टणकर, मालिकाविर व सामनाविर वेदभुषण खरोडे यांना गौरविण्यात आले.
मुलींमध्ये डीयुपीएमसी जळगाव विजेता
मुलींच्या स्पर्धेत ७ संघ सहभागी झाले होते यात अंतिम सामन्यात २०२२ अगस्त बॅचने २०२० अधिरथ बॅचचा २ धावांनी परावभ करत विजेतेपद पटकावले. या क्रिकेट लिगचे थेट प्रक्षेपण देखिल करण्यात आले होते. हजारो दर्शकांनी थेट प्रक्षेपणाव्दारे सामन्याचा आस्वाद घेतला. मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत