Contact Banner

३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील शल्यचिकीत्सकांच्या टीमचे उल्लेखनीय यश




३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील शल्यचिकीत्सकांच्या टीमचे उल्लेखनीय यश

जळगाव लेवाजगत न्यूज प्रतिनिधी – काही दिवसांपासून तीव्र पोटदुखी, पोट फुगणे, सतत गॅस होणे तसेच संडास न होण्याच्या त्रासाने हैराण झालेल्या ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांना पडलेला गंभीर पीळ येथील मधील तज्ज्ञ शल्यचिकीत्सकांच्या टीमने वेळेत ओळखून शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सोडविला. वेळेवर निदान आणि तातडीच्या उपचारामुळे महिलेचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येथील सरला भिवसने (वय ३८) या महिलेला मागील काही दिवसांपासून सतत पोट फुगणे, तीव्र वेदना, गॅसचा त्रास तसेच पूर्णपणे संडास न होण्याची समस्या जाणवत होती. सुरुवातीला साधा पोटदुखीचा त्रास समजून दुर्लक्ष करण्यात आले; मात्र वेदना वाढत गेल्याने आणि पोट अधिक फुगू लागल्याने रुग्णाला तातडीने येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

रुग्णालयात तपासणीनंतर आतड्यांचा पीळ (इंटेस्टाइनल व्हॉल्व्युलस) झाल्याचे निदान झाले. ही स्थिती जीवघेणी ठरू शकते, त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शल्यचिकीत्सकांच्या कुशल टीमने अत्यंत दक्षतेने शस्त्रक्रिया पार पाडत आतड्यांचा पीळ सोडवून रक्तपुरवठा सुरळीत केला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून ती जलदगतीने बरी होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ पोटदुखी, पोट फुगणे, उलट्या, गॅस किंवा शौच न होणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. वेळेवर उपचार मिळाल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते, असेही त्यांनी नमूद केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.