Contact Banner

६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी हभप जगन्नाथ महाराज नेत्रालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया

 

66-vya-vadhdivsanimit-66-jananna-milali-navi-drishti-hbhp-jagannath-maharaj-netralayat-tadnya-doctorankadun-yashasvi-shastrakriya


६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी

हभप जगन्नाथ महाराज नेत्रालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया

लेवाजगत न्यूज | जळगाव – गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ रुग्णांवर मोतीबिंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना नवजीवन देण्यात आले. हभप जगन्नाथ महाराज नेत्रालय येथे आयोजित या विशेष उपक्रमात नेत्रतज्ज्ञ डॉ. नितु पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीमने शस्त्रक्रिया पार पाडल्या.

डॉ. उल्हास पाटील यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. नेत्रालयाच्या माध्यमातून खान्देश व विदर्भातील ६६ गरजू रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने यशस्वीपणे करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर डॉ. पाटील यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी रुग्णांनी “डॉ. उल्हास पाटील रुग्णालयामुळे आम्हाला नवदृष्टी मिळाली,” अशी कृतज्ञ भावना व्यक्त केली.

शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी विभागप्रमुख डॉ. एन. एस. आर्विकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत तसेच नेत्रतज्ज्ञ व सहकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

डॉ. नितु पाटील यांचा कोट :

“दरवर्षीप्रमाणे यंदाही सरांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ नेत्ररुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून ही आमची वाढदिवस भेट आहे. सरांना गणेशाची सिद्धी, हनुमानाची भक्ती, चाणक्याची नीती, शारदेचे ज्ञान, भीष्माचे वचन, कर्णाचे दान, कुबेराचे भांडार आणि भगवान धन्वंतरींची कृपा लाभो, हीच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.”

रुग्णांची प्रतिक्रिया :

“मोठ्या व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त शिबिर म्हटले की मोफत असूनही काही ना काही खर्च होतो, असा अनुभव असतो. पण येथे आम्हाला एकही रुपया खर्च न करता अत्याधुनिक सुविधा, स्वच्छ वार्ड, आपुलकीची सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळाले. डॉ. उल्हास पाटील इतके मोठे व्यक्तिमत्त्व असूनही आमच्यातलेच होऊन वाढदिवस साजरा करतात. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या डॉ. पाटील यांना दीर्घायुष्य लाभो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना,” अशी भावना रुग्णांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.