Contact Banner

उशिरा परवानगी असलेली दुकाने रात्री १० नंतर बंद करू नका : एसपींचे आदेश


ushira-parvangi-asleli-dukane-ratri-10-nantar-band-karu-naka-spanche-adesh


उशिरा परवानगी असलेली दुकाने रात्री १० नंतर बंद करू नका : एसपींचे आदेश

प्रतिनिधी जळगाव-

राज्य सरकारने मद्यविक्रीची दुकाने सोडून इतर सर्व आस्थापना २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी जिल्ह्यात मात्र या निर्णयाची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे दिसून आले आहे. रात्री १० नंतर दुकान सुरू ठेवणाऱ्यांना पोलिसांच्या अडवणुकीचा आणि कारवाईचा सामना करावा लागत होता. या प्रकरणी जिल्हा प्रशासन व सहाय्यक कामगार आयुक्तांनी पोलिस अधीक्षकांना लेखी पत्र देऊन कायद्याची आठवण करून दिली आहे.

त्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सर्व पोलिस ठाण्यांना पत्र देऊन रात्री दुकाने बंद करण्यास सक्ती करू नये, असे आदेश दिले.

काय आहे नियम?

दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ नुसार, ज्या दुकानांकडे वैध शॉप अ‍ॅक्ट परवाना आहे आणि १० पेक्षा कमी कामगार आहेत अशा दुकानांना २४ तास सुरू ठेवण्यास शासनाची परवानगी आहे. मात्र मद्य विक्रीची दुकाने सोडून इतर हॉटेल्स व व्यावसायिक दुकाने रात्रीच्या वेळी सुरू ठेवता येतील.

नियमानुसार आस्थापना सुरू ठेवण्याच्या सूचना

शासनाने निर्णय घेतला आहे. त्यातील अटी-शर्ती व नियमांनुसार जिल्ह्यातील सर्व आस्थापना सुरू ठेवण्याबाबत पोलिस ठाण्यांना कळवले आहे.
— डॉ. महेश्वर रेड्डी, पोलिस अधीक्षक

जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत सहाय्यक कामगार आयुक्तांना निर्देश दिले. त्यानुसार सहाय्यक कामगार आयुक्तांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना लेखी पत्र दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.