मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
लेवाजगत न्यूज, जळगाव : डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव यांच्या कृषीदूतांमार्फत देवपिंप्री आणि माळपिंप्री येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी मेळाव्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद लाभला.
मेळाव्याचे उद्घाटन गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (जामनेर) मा. सुभाष अहिरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळपिंप्रीच्या सरपंच सुनिता ज्ञानेश्वर पाटील होत्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांच्यासह उपसरपंच संजय रमेश पाटील (देवपिंप्री), पोलीस पाटील धनंजय रामधन पाटील (माळपिंप्री), मंडळ कृषी अधिकारी भागवत किसन चिमकर, प्रा. एन. बी. सदार (वनस्पती शास्त्र विभाग), सहाय्यक कृषी अधिकारी मिलिंद पाटील, शरद सुरडकर, राहुल बावस्कर, विनय अॅग्रोचे जगदीश पाटील, बापू काळबैले, किरण भाऊ पाटील, पळसखेडेचे उपसरपंच रवी हडप, प्लांटो कंपनीचे प्रतिनिधी दीपक डोंगरे, आयडियल कंपनीचे प्रतिनिधी पंकज पाटील, कृषी पदवीधर प्रज्वल देशमुख, कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. एस. पाटील आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम. गोणशेटवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषीदूत सुशांत शंकर जाधव आणि श्रीकृष्ण पुंडलिक सोनोने यांनी केले, तर प्रस्तावना प्रा. बी. एम. गोणशेटवाड यांनी मांडली. कृषीदूत अमन मोगल आणि कृषी कन्या नेहा बाविस्कर यांनी मेळाव्याच्या विषयाची माहिती शेतकऱ्यांना दिली.
मेळाव्यात मार्गदर्शकांनी शाश्वत व समृद्ध शेती, टरबूज लागवड तंत्रज्ञान, उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजना तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत प्रभावी वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यामुळे उपस्थित शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मोलाची माहिती मिळाली.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. बी. एम. गोणशेटवाड यांनी आभार प्रदर्शन करून मेळाव्याचा समारोप केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत