पाकिस्तान हादरला! राजधानीत नमाजावेळी मोठा स्फोट; 15 जणांचा मृत्यू, 80 जखमी; आणीबाणी लागू
पाकिस्तान हादरला! राजधानीत नमाजावेळी मोठा स्फोट; 15 जणांचा मृत्यू, 80 जखमी; आणीबाणी लागू
लेवाजगत न्युज पाकिस्तान:- पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये मोठा स्फोट झाला आहे. तरलाई परिसरात असलेल्या इमाम बारबाह खदीजत-उल-कुबरामध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर एकच खळबळ उडाली. परिसरात असलेले लोक सैरावैरा पळू लागले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव दलाची पथकं दुर्घटनास्थळी पोहोचली. त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरु केलं. शुक्रवारी नमाज सुरु असताना स्फोट झाला. यामध्ये 31 जणांचा मृत्यू झाला असून ८० हून जास्त जण जखमी झाले आहेत.
शुक्रवारी नमाज अदा केला जात असताना इस्लामाबादमध्ये मोठा स्फोट झाला. यामध्ये 31 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप तरी कोणत्याही दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. स्फोटाची तीव्रता आणि त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थितीचं गांभीर्य पाहता संपूर्ण शहरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. सुरक्षा दलांनी इमाम बारगाह आणि आसपासच्या परिसराला वेढा दिला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करडी नजर ठेवली जात आहे.
स्फोटामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. तपास यंत्रणा सध्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून पुरावे गोळा केले जात आहेत. स्फोट कोणत्या परिस्थितीत झाला आणि त्यामागे नेमकं कोण आहे, याचा शोध सुरु आहे. या स्फोटातील जखमींची संख्या ८० पेक्षा जास्त आहे. त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
इस्लामाबादच्या शहजाद टाऊन परिसरात असलेल्या तरलाई इमामवाड्यात स्फोट झाला. स्फोटातील जखमींवर सध्या आसपासच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. इस्लामाबादच्या पॉलीक्लिनिक, पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि सीडीए रुग्णालयात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. मुख्य आपत्कालीन, ऑर्थोपेडिक, बर्न सेंटर आणि न्यूरोलॉजी विभाग सक्रिय झाले आहेत. ते पूर्ण क्षमतेनं काम करत आहेत. या विभागातील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या, रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत